Pune Election : काम करणारे नेतृत्व, प्रभाग क्रमांक तीनमध्ये भाजप देणार रामभाऊ दाभाडेंना संधी?

Pune Election : पुणे महानगरपालिकेतील विमान नगर, लोहगाव आणि वाघोली परिसर समाविष्ट असलेल्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये आगामी निवडणुकांच्या

  • Written By: Published:
Pune Election

Pune Election : पुणे महानगरपालिकेतील विमान नगर, लोहगाव आणि वाघोली परिसर समाविष्ट असलेल्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सक्षम आणि कामाचा अनुभव असलेल्या नेतृत्वाची मागणी स्थानिक नागरिकांमधून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर वाघोली ग्रामपंचायत काळात विकासकामांचा ठसा उमटवलेले आणि सातत्याने लोकसंपर्क राखणारे रामभाऊ दाभाडे यांचे नाव काम करणारे नेतृत्व म्हणून नागरिकांमध्ये चर्चेत आहे. त्यामुळे त्यांना भाजपकडून प्रभाग क्रमांक तीनमधून त्यांना उमेदवारी मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

वाघोली (Wagholi Election) ग्रामपंचायत कार्यरत असताना रामभाऊ दाभाडे (Rambhau Dabhade) यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज, सार्वजनिक सुविधा तसेच गार्डन, धार्मिक व सांस्कृतिक स्थळांच्या विकासासाठी ठोस पावले उचलली गेली. या कामांमुळे त्या काळात गावाच्या मूलभूत सुविधांना चालना मिळाली, अशी भावना आजही स्थानिक नागरिक व्यक्त करतात. विकास कामांबरोबरच सामाजिक जबाबदारी जपणारे नेतृत्व म्हणूनही रामभाऊ दाभाडे यांची ओळख आहे.

महिलांसाठी बचतगट व प्रशिक्षण उपक्रम, युवकांसाठी क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम, आपत्ती काळातील मदतकार्य आणि विविध सेवा उपक्रमांमुळे त्यांनी सामान्य नागरिकांशी विश्वासाचे नाते निर्माण केले आहे.

पुण्यात ऑपरेशन ‘लोटस’, आमदार पुत्र सुरेंद्र पठारे भाजपवासी, पण का? समजून घ्या राजकारण

प्रभाग क्रमांक तीनमध्ये पाणीप्रश्न, विमाननगर- लोहगाव -वाघोली, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन आणि नागरी सुविधा हे प्रश्न अधिक तीव्र होत असताना, केवळ आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेले नेतृत्व आवश्यक असल्याची भावना मतदारांमध्ये आहे. त्यामुळेच रामभाऊ दाभाडे यांना आगामी काळात या प्रभागात काम करणारे, विकासा भिमुख नेतृत्व म्हणून संधी दिली जावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

follow us