‘वंदे भारत मेट्रो’मध्ये नाशिक, मुंबई, पुण्याचा विचारा व्हावा; मुरलीधर मोहोळांचं रेल्वेमंत्र्यांकडे साकडं

‘वंदे भारत मेट्रो’मध्ये नाशिक, मुंबई, पुण्याचा विचारा व्हावा; मुरलीधर मोहोळांचं रेल्वेमंत्र्यांकडे साकडं

Murlidhar Mohol : वंदे भारत मेट्रोमध्ये पुण्याहून नाशिक, मुंबई, सोलापूर, नागपूर या महानगरांचा विचार व्हावा, असं साकडं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विन वैष्णव (Ashwin Vaishnav) यांच्याकडे घातलं. दरम्यान, पुणे विभागातील रेल्वेच्या विविध प्रश्नांसदर्भात मोहोळ यांनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, रेल्वेच्या प्रलंबिथ प्रश्न मार्गी लावण्याबाबत सकारात्मक चर्चा झालीयं. विशेष म्हणजे वैष्णव यांनी प्रलंबित विषय मार्गी लावण्यासंदर्भात प्रत्यक्ष नकाशावर सविस्तर माहिती दिली असल्याचं खुद्द मोहोळ यांनी सांगितलंय.

आमदारांवर हल्ले, राऊत संतापले; म्हणाले, ‘हे सरकार एक टोळीच अन् प्रमुख दिल्लीत..,’

मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वेचे अनेक विषय गेली काही वर्षे प्रलंबित आहेत. या प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढला जावा, यासाठी केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी पुढाकार घेतलायं. प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवल्याने हे विषय लवकरच मार्गी लागणार आहेत. तसेच पुणे-दिल्ली वंदे भारत स्लिपर ट्रेन, पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण, पुणे-अहिल्यानगर रेल्वे कनेक्टिव्हिटी, पुणे रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण, उरुळी कांचन येथे नवे टर्मिनल आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. तर आगामी काळातील कृती आराखड्यावरही सविस्तरपणे चर्चा झाली असल्याचं मोहोळ यांनी सांगितलंय.

काळजी घ्या! पुढील चार दिवसात मुसळधार; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अन् रेड अलर्ट

केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी आगामी काळात महानगरांना जोडणाऱ्या वंदे भारत मेट्रो सेवा सुरु करणार असल्याची घोषणा संसदेत केली. या घोषणेच्या अनुषंगाने पुण्याहून नाशिक, मुंबई, सोलापूर, नागपूर या महानगरांसाठी वंदे भारत मेट्रोचा विचार व्हावा, असं साकडंही मोहोळ यांनी रेल्वेमंत्र्यांना घातल्याचं सांगितलंय.

Sonu Sood: फतेहच्या रिलीजच्या तारखेची घोषणा आणि चाहत्यांनी अभिनेत्याला दिली ‘ही’ खास गोष्ट

दरम्यान, राज्यातील काही भागांत रेल्वेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पुण्यासह राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात रेल्वेच्या सुविधांबाबत मोहोळ यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांच्याशी चर्चा केलीयं. यामध्ये वंदे भारत मेट्रोची सेवा महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे अशा महानगरांना जोडली गेली तर राज्याला त्याचा अधिक फायदा होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube