आमदारांवर हल्ले, राऊत संतापले; म्हणाले, ‘हे सरकार एक टोळीच अन् प्रमुख दिल्लीत..,’

आमदारांवर हल्ले, राऊत संतापले; म्हणाले, ‘हे सरकार एक टोळीच अन् प्रमुख दिल्लीत..,’

Sanjay Raut : हे सरकार म्हणजे एक टोळी असून टोळीचे प्रमुख दिल्लीमध्ये बसले आहेत, या शब्दांत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारवर संताप व्यक्त केलायं. दरम्यान, विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला, त्यानंतर काल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. आमदारांवर होणाऱ्या हल्ल्यावरुन संजय राऊत यांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतलायं.

काळजी घ्या! पुढील चार दिवसात मुसळधार; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अन् रेड अलर्ट

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे सदस्य आपापल्या भूमिका मांडत असतात, लोकशाहीला धरुनच ते भूमिका मांडत असता, पण ती भूमिका कोणाला आवडत नाही म्हणून त्यांच्यावर असे हल्ले करत असतील आणि सरकार समर्थन देत असेल तर राज्यात घटनाबाह्य सरकार आहे. हे सरकार गुंडांना पोसणारं असून गुंडगिरीचं नियंत्रण दिल्ली, गुजरातमधून होत असल्याचं स्पष्ट दिसत असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.

SC-ST आरक्षणाचा लाभ `क्रिमी लेअर` वर्गाला नकोच : सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

तसेच ज्या पद्धतीने दाऊद इब्राहिम त्याच्या मुंबईतला टोळ्या चालवतो किंवा छोटा शकील टायगर मेमन हे मुंबईत अंडरवर्ल्डच्या टोळ्या चालवतात. त्याच पद्धतीने हे सरकार म्हणजे एक टोळी आहे, त्या टोळीचे प्रमुख दिल्लीमध्ये बसले आहेत. ते टोळ्या चालवत असून आपल्या सरकार टिकवण्यासाठी खालच्या गुड्यांच्या टोळ्या पोसतात, मग आमदार, खासदार यांच्यावरचे हल्ले, लुटालुट, खून, लूटपाट सगळं काही चालतं, अशी खोचक टीका संजय राऊतांनी केलीयं.

IPL 2025 साठी नाही होणार मेगा लिलाव, शाहरुख खान का संतापला? वाचा, बैठकीची Inside Story

शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही मशाल चिन्हावरचं महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्व निवडणुका लढवेल. या मशाल चिन्हाने महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या खुर्चीला आग लावली लोकसभेत मशाल चिन्हानेच सर्वांचा पराभव केला. मशाल असेल तुतारी वाजवणारा माणूस असेल ही आमची चिन्ह आहेत. आणि काँग्रेसचा हात आहे असे आम्ही एकत्र निवडणुका लढू. पण शिवसेनेचं चिन्ह हे आता धनुष्यबाण नसून मशाल आहे. आणि धनुष्यबाण हे चोरांच्या हातामध्ये असल्याची टीकाही संजय राऊतांनी शिंदे गटावर केलीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube