काळजी घ्या! पुढील चार दिवसात मुसळधार; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अन् रेड अलर्ट
Weather Update : मुंबई पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी धुमाकूळ (Weather Update) घातल्यानंतर मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसांपासून (Rain Alert) विश्रांती घेतलेल्या पावसाने 1 ऑगस्टपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. आता 5 ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अद्याप समाधानकारक पाऊस (Heavy Rain) झालेला नाही. कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यांना मात्र पावसाने झोडपून काढले आहे. अतिवृष्टीही झाली आहे. आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पश्चिम बंगाल (West Bengal) आणि जवळच्या बांग्लादेशच्या CYCIR प्रभावामुळे पुढील 24 तासांत कमी दाबाचा (Mumbai Rains) पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली तर पाच दिवसात जोरदार पाऊस होईल. विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र या भागात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
Pune Rain Alert: पावसाचा हाहाकार! 5 जणांचा मृत्यू, जाणून घ्या ताजे अपडेट
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी संततधार पाऊस सुरुच आहे. आजही जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आज जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे. तसेच पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज (Pune Rains) अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
1stAug:पश्चिम बंगाल व लगतच्या दक्षिण बांगला देशवरच्या CYCIR च्या प्रभावाखाली पुढील 24 तासात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता.पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा.येत्या 5 दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा.विदर्भासह कोकण,मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतितीव्र हवामान pic.twitter.com/vDVorFx27j
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 1, 2024
‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
मुंबई, पालघर, नाशिक, ठाणे, जालना, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर जिल्ह्यांना यलो तर कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी काळजी घ्यावी. आवश्यकता असेल तर घराच्या बाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Weather Update : अतिमुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
दरम्यान, मागील आठवड्यात पुण्यातील धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने खडकवासला धरणाच्या सांडव्यातून पुण्यात मुठा नदी पात्रामध्ये ४० हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलं होतं. त्यामुळे मुठा नदीला पूर येऊन डेक्कन, सिंहगड रोड, एकता नगर, पुलाची वाडी या भागात पाणी शिरलं. अचानक पाणी वाढल्याने नागरिक घरातच अडकून पडले. अनेक घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले. दरम्यान, पुणे शहरासह लगतच्या गावांनाही फटका बसला होता. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या होत्या.