Pune MPSC student protesters Police deny permission and order immediate vacation of the site S M Joshi bridge : एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी गेल्या सात दिवसांपासून पुण्यात एमपीएससी विद्यार्थींकडून आंदोलन करण्यात येत आहे. मात्र आता या आंदोलनाला मोठा धक्का बसला आहे. कारण या आंदोलनाला पोलीसांनी परवानगी नाकारली असून तात्काळ एस एम जोशी पुलावरील आंदोलन स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
परवानगी नाकारत तात्काळ जागा खाली करण्याचे पोलिसांचा आदेश
या नोटीसमध्ये पोलीसांनी म्हटले आहे की, आपणास या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, MPSC विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी दि. ०२/१०/२०२६ रोजीपासून विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. वरील विषयावर दि. ३०/०९/२०२६ रोजी मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य व विद्यार्थी प्रतिनिधी यांची बैठक झाली. सदरची बैठक ही सकारात्मक वातावरणात संपन्न होऊन विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्या मा. मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केल्या आहेत.
35 रुपयांपासून कोट्यवधींच्या संपत्तीपर्यंत; नाना पाटेकरांनी कसं उभं केलं साम्राज्य ?
ज्याअर्थी, त्यानंतर दिनांक ०२/१०/२०२६ रोजी आपण विद्यार्थ्यांच्या वतीने आपले नियोजित धरणे आंदोलन स्थगित करीत असल्याबाबतचे लेखी पत्र मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर कार्यालयात दि. ३०/०९/२०२६ रोजी सादर केले. आपल्या आंदोलन स्थगितीच्या पत्रावरून आपणास यापूर्वी दि. ०२/१०/२०२६ रोजी आंदोलनासाठी दिलेल्या परवानगीचे आदेश निरर्थक होऊन ते रद्द समजण्यात यावेत, याबाबतचे लेखी पत्र दि. ३०/०९/२०२६ रोजी विद्यार्थी प्रतिनिधींना दिले होते. सर्व मागण्या पूर्ण झाल्यानंतर व आंदोलन स्थगित केल्याचे पत्र दिल्यानंतरही आपण व आपल्या साथीदारांनी मिळून कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा परवानगी न घेता अचानकपणे दि. ०१/१०/२०२६ रोजी प्रतिबंधित ठिकाणी अनधिकृतपणे MPSC विद्यार्थ्यांचा जमाव जमवून प्रक्षोभक वक्तव्य करून विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी उद्युक्त करून दि. ०१/१०/२०२६ रोजी १८.०० वा. पासून लडकत चौक, एस. एम. जोशी पुल, पत्रकार भवन जवळ, पुणे येथे गैरकायदेशीर धरणे आंदोलनास सुरुवात केलेली आहे.
अर्थी, पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात सुरू असलेले प्रतिबंधात्मक आदेशाबाबत आपणास अवगत करून कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने वरील धरणे आंदोलन गैरकायदेशीर असलेबाबत आपणास विश्रामबाग पोलीस ठाणे जा.क्र. ५४४/२०२६ अन्वये दि. ०१/१०/२०२६ रोजीचे लेखी पत्र देऊन सूचित करण्यात आलेले होते. तसेच त्याबाबत तोंडी व लेखी सूचना देऊन देखील आपण आपल्या सहकाऱ्यांसह गैरकायदेशीर आंदोलन सुरू ठेवले आहे. दि. ३०/०९/२०२६ रोजी मा. मुख्यमंत्री महोदयांसोबत झालेल्या विद्यार्थी प्रतिनिधींच्या बैठकीमध्ये सर्व मुद्यांवर यशस्वी चर्चा झालेली आहे. आपण आपल्या इतर मागण्यांसाठी संविधानिक मार्गाचा अवलंब करून संबंधितांकडे दाद मागून पाठपुरावा करणे उचित असणार आहे.
Amazon Great Indian Festival Sale : iPhone 16 तब्बल 18 हजारांनी स्वस्त; जाणून घ्या भन्नाट ऑफर
आपल्या सुरू असलेल्या गैरकायदेशीर आंदोलनामध्ये विद्यार्थीवर्गावर मोठ्या प्रमाणात दबाव आणला जात आहे. त्याबरोबर आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी प्रवृत्त करीत आहात. त्यादरम्यान आंदोलनाकडून पत्रकारांवर हल्ला केल्याची घटना समोर आली असून याबाबत विश्रामबाग पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गु.र.जि.नं. ४१२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल आहे.
ज्याअर्थी, दि. ०२/१०/२०२६ रोजी आपण दिलेल्या अर्जाच्या अनुषंगाने विश्रामबाग पोलीस स्टेशन जा.क्र. ५४८/२०२६ दि. ०२/१०/२०२६ रोजीच्या पत्रान्वये आपणास आंदोलन करण्याकरिता परवानगी नाकारण्यात आली आहे. तरी देखील आपण एस. एम. जोशी पुल या ठिकाणी गैरकायदेशीरपणे आंदोलन सुरू ठेवले आहे. आपण पोलिसांकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या वाजवी निर्देशांकडे दुर्लक्ष करून त्याचे उल्लंघन करीत आहात.
सावंत कुटुंबातील वादावर पडदा; तानाजी आणि शिवाजीराव सावंतांचे अखेर मनोमीलन !
तसेच ज्याअर्थी, आज दिनांक ०७/१०/२०२६ रोजी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट पिटीशन क्र. १३३७५/२०२६ च्या सुनावणीदरम्यान प्रतिवादी क्र. ०३ (प्रमोद पाटील, अर्जदार) यांच्या वतीने सांगण्यात आले आहे की, तसेच मा. उच्च न्यायालयाने परिच्छेद क्र. १६ मध्ये निर्देशित केले आहे की, पुणे शहर हे मोठे आणि विविध क्षेत्रांना जोडणारे व्यापारी केंद्र असल्याने सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक अडथळे निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक आहे. रस्ते, पूल व सार्वजनिक ठिकाणी आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम होऊन पुणेकरांच्या दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण होऊ नये.
मा. उच्च न्यायालयाने परिच्छेद क्र. २१ मध्येही राज्य सरकारला आंदोलनामुळे रस्त्यांवरील वाहतुकीचा मुक्त प्रवाह बाधित होणार नाही, यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्याअर्थी, आज दि. ०७/१०/२०२६ रोजी आपल्याकडून MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी एस. एम. जोशी पुल (पत्रकार भवन शेजारी) येथे आंदोलनाची परवानगी पुन्हा स्थापित करून आंदोलनाची परवानगी मिळण्याकरिता पत्र प्राप्त झाले आहे. आणि ज्याअर्थी, आपल्या दिनांक ०१/१०/२०२६ पासून सुरू असलेल्या गैरकायदेशीर आंदोलनामुळे परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होत आहे व वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. आपल्या आंदोलनादरम्यान “पुणे बंद पाडू” वगैरे प्रकारची चिथावणीखोर वक्तव्ये केली जात असून विद्यार्थ्यांना अभ्यासापासून परावृत्त करून नमूद गैरकायदेशीर आंदोलनात येण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे.
तसेच स्थानिक रहिवाशांच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे व वरील सर्व बाबींचा परिणाम म्हणून परिसरात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याची आमची खात्री पटलेली आहे. त्याबाबत स्थानिक नागरिकांकडून मा. उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल होऊन मा. उच्च न्यायालयाने वर नमूदप्रमाणे आदेश पारित केलेले आहेत. त्याअर्थी, मी प्रशांत अमृतकर, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर, मला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ प्रमाणे प्राप्त अधिकारांच्या संदर्भातील पत्राच्या अनुषंगाने लडकत चौक, एस. एम. जोशी पुल (पत्रकार भवन शेजारी), पुणे येथील सार्वजनिक रस्त्यावर ‘धरणे/ठिय्या आंदोलन’ यासाठी पोलीस परवानगी नाकारण्यात येत आहे.
तसेच आदेशित करण्यात येत आहे की, आपण सदर परिसर तात्काळ रिकामा करावा. तसेच उपरोक्त नमूद ठिकाण सोडून पर्यायी ठिकाणी उदा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे या ठिकाणी विहित वेळेसाठी आंदोलन करण्याबाबत आपण लेखी परवानगीसाठी अर्ज दिल्यास त्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
