ज्ञानेश कुमारांच्या समर्थनार्थ 42 माजी न्यायाधीश; पत्रातून म्हणाले, ‘राजकीय स्वार्थासाठी बदनाम करण्याचे विरोधकांचे प्रयत्न’

42 Former Judges On Election Commission; 42 माजी न्यायाधीशांनी निवडणूक आयोग आणि इतर घटनात्मक संस्थांवर आक्षेप घेतल्यामुळे चिंता व्यक्त केली.

42 Former Judges On Election Commission

42 Former Judges On Election Commission: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 42 माजी न्यायाधीशांनी आपली भूमिका मांडली आहे. ज्ञानेश कुमार यांना ‘कठपुतली’, ‘चोर’ आणि ‘तडजोड केलेला अधिकारी’ अशा शब्दांत लक्ष्य केले जात असल्याबद्दल या माजी न्यायाधीशांनी चिंता व्यक्त केली. हा प्रकार राजकीय स्वार्थातून राबवली जाणारी नियोजित मोहीम असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्या 42 माजी न्यायाधीशांची नावे समोर आली आहेत.

 

‘संस्थांवर टीका करा, बदनामी नको’

‘पीटीआय’च्या वृत्तानुसार 42 माजी न्यायाधीशांनी एका खुल्या पत्रातून निवडणूक प्रक्रियेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना अशा पद्धतीने लक्ष्य करण्यास आक्षेप घेतला. सत्ता बदलल्यानंतर कारवाईची भाषा करणे आणि अधिकाऱ्यांना धमकावणे हे लोकशाही संस्थांसाठी घातक ठरू शकते, असे त्यांनी म्हटले.

‘संस्थांवर टीका करणे हा लोकशाहीतील अधिकार आहे, मात्र संस्थांची बदनामी करणे योग्य नाही,’ असे त्यांनी पत्रात स्पष्ट केले.

याचिकांमागे पुरावे कुठे? माजी न्यायाधीशांचा सवाल

काही कार्यकर्त्यांच्या संघटना निवडक पद्धतीने न्यायालयीन याचिका दाखल करत असून, त्यामुळे गंभीर आरोपांना कायदेशीर स्वरूप मिळत असल्याचा दावा माजी न्यायाधीशांनी केला. मात्र, अनेकदा या आरोपांच्या समर्थनार्थ पुरावे सादर केले जात नसल्याचेही त्यांनी म्हटले.

Amazon Great Indian Festival Sale : iPhone 16 तब्बल 18 हजारांनी स्वस्त; जाणून घ्या भन्नाट ऑफर

सीजेपीकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर करण्यात येत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर माजी न्यायाधीशांच्या पत्रातील हा उल्लेख महत्त्वाचा मानला जात आहे.

काँग्रेसच्या भूमिकेवरही प्रश्न

माजी न्यायाधीशांनी काँग्रेसच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित केला. ज्या ईव्हीएमच्या माध्यमातून काँग्रेसला निवडणुकीत विजय मिळाला, त्याच व्यवस्थेवर आता प्रश्न उपस्थित केले जात असल्याचे त्यांनी म्हटले.

सावंत कुटुंबातील वादावर पडदा; तानाजी आणि शिवाजीराव सावंतांचे अखेर मनोमीलन !

निवडणूक आयोगाने मागितलेले प्रतिज्ञापत्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सादर केले नसल्याचा उल्लेखही पत्रात करण्यात आला.

follow us