35 रुपयांपासून कोट्यवधींच्या संपत्तीपर्यंत; नाना पाटेकरांनी कसं उभं केलं साम्राज्य ?
Nana Patekar: वेगवेगळ्या माध्यमांतील वृत्तानुसार त्यांची संपत्ती 60 ते 80 कोटी रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे.
Nana Patekar passes away : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) हे गुरुवारी काळाच्या पडद्याआड झाले. कोणताही चित्रपटाचा वारसा, इंडस्ट्रीतील मोठा आधार नसताना त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख छाप निर्माण केली. अत्यंत सामान्य परिस्थितीतून आलेल्या ‘नानां’नी आपल्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर मोठे यश मिळवले आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांची किती संपत्ती होती याची चर्चा सुरू झाली आहे.
सिनेमांचे पोस्टर्स रंगविण्याची कमाई 35 रुपये
नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीत पहिली कमाई किती होती, याबाबत माहिती दिली होती. त्यांनी वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी काम करण्यास सुरुवात केली होती. नववीत शिकत असताना ते सिनेमांची पोस्टर्स रंगवायचे आणि त्यातून दरमहा 35 रुपये कमवायचे आहे. शाळेतून कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी ते जवळपास आठ किलोमीटर पायी चालत असत. नाना पाटेकरांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ काम करत त्यांनी मोठी संपत्ती कमावली आहे. वेगवेगळ्या माध्यमांतील वृत्तानुसार त्यांची संपत्ती 60 ते 80 कोटी रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे.
सावंत कुटुंबातील वादावर पडदा; तानाजी आणि शिवाजीराव सावंतांचे अखेर मनोमीलन !
1978 मध्ये ‘गमन’ या चित्रपटातून त्यांना बॉलिवूडमध्ये पहिली संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर भारतीय चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘अग्निसाक्षी’, ‘अब तक छप्पन’, ‘नटसम्राट’ आणि ‘वेलकम’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्यांच्या दमदार अभिनयामुळे ते प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिले.
विराट आऊट झाल्यामुळे न जेवणाऱ्या नानांसाठी कोहलीची भावूक पोस्ट म्हणाला, एक खरे दिग्गज…
चित्रपटांमधून कोट्यवधींची कमाई
कारकीर्द जसजशी पुढे गेली, तसतशी नाना पाटेकर यांची कमाईही वाढत गेली. माध्यमांतील वृत्तांनुसार, कारकीर्दीच्या उत्तरार्धात ते एका चित्रपटासाठी सुमारे 2 ते 3 कोटी रुपये मानधन घेत असत. याशिवाय विविध कार्यक्रम, उपस्थिती आणि ब्रँडशी संबंधित कामांमधूनही त्यांना उत्पन्न मिळत होतं. मात्र, त्यांची संपत्ती केवळ चित्रपटांमधून मिळालेल्या उत्पन्नापुरती मर्यादित नव्हती.
कोट्यवधींची संपत्ती, पण राहणीमान साधं
मोठी संपत्ती असूनही नाना पाटेकर हे साधं जीवन जगण्यासाठी ओळखले जात होते. अनेक वर्षे ते मुंबईतील अंधेरी येथील सुमारे 750 चौरस फुटांच्या एका बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहत होते. या घराची किंमत सुमारे 3 कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. याशिवाय नाना पाटेकर यांचं गोव्यातही घर होतं. पुण्यातील खडकवासला परिसरात त्यांचा सुमारे 27 एकरांचा फार्महाऊस असल्याचं सांगितलं जातं. या ठिकाणी ते शेती करत असत. येथे गहू आणि भात यांसारखी पिकं घेतली जात होती.
कारचाही साधेपणा कायम
बॉलिवूडमधील अनेक कलाकारांकडे महागड्या आणि आलिशान गाड्यांचा मोठा ताफा असतो. मात्र नाना पाटेकर यांच्या बाबतीतही त्यांचा साधेपणा कायम दिसून आला. त्यांच्याकडे महिंद्रा जीप CJ4, महिंद्रा स्कॉर्पिओ आणि ऑडी Q7 यांसारख्या गाड्या होत्या. महागड्या वस्तूंच्या बाबतीतही नाना पाटेकर यांची भूमिका वेगळी होती. एका प्रसंगी त्यांनी सुमारे 1.5 कोटी रुपये खर्च करून आलिशान कार खरेदी करण्यास नकार दिला होता. एवढे पैसे एखाद्या महागड्या गाडीवर खर्च करण्यापेक्षा ते शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरणं अधिक योग्य असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.