Pune Municipal Corporation Elections : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये युती तुटली आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरुन वाद निर्माण झाल्याने शिवसेना शिंदे गटाने युतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेत उमेदवारांना एबी फॉर्म वाटण्यास देखील सुरुवात केली आहे. तर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पुण्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये युती तुटली नसल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे. विजय शिवतारे यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये युती तुटलेली नसल्याची माहिती देताच पुण्यातील राजकारणात नवीन ट्विस्ट निर्माण झाले आहे.
माध्यमांशी बोलताना विजय शिवतारे (Vijay Shivtare) म्हणाले की, भाजप आणि शिवसेनेमध्ये युती तुटली नाही. गेल्या चार-पाच दिवस चर्चेत वेळ गेल्याने आता वेळ कमी असल्याने उमेदवारांना फॉर्म देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र चर्चा करुन अर्ज मागे घेण्यात येणार आहे असं माध्यमांशी बोलताना माजी मंत्री विजय शिवतारे म्हणाले.
शिवसेनेकडून (Shivsena) 100 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले असून आज देखील काही उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येत आहे मात्र मुंबईवरुन जे काही निर्णय येईल त्यानुसार पुढील प्रक्रिया होणार असल्याची देखील माहिती विजय शिवतारे यांनी दिली आहे.
मोठी बातमी; नवी मुंबईत भाजप शिवसेना स्वबळावर लढणार
पुणे महानगर पालिका निवडणुकीसाठी (Pune Municipal Corporation Elections) भाजपकडून (BJP) शिवसेना शिंदे गटाला फक्त 15 जागा देण्यात येत असल्याने शिवसेना शिंदे गटाने पुणे महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
मोठी बातमी; अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून गुंड गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी
