Pune Ganpati Visarjan : राज्यभरात काल गणेश विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला. विविध जिल्ह्यांत ढोल-ताशाच्या गजरात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. गणपती विसर्जनादरम्यान, अनेक ठिकाणी तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. पुण्यातही असाच प्रकार समोर आला आहे. गणपती विसर्जन मिरवणूक पाहत असतानाच चार वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला आहे.
मुलुंडमध्ये मराठी महिलेला जागा नाकारली, हुज्जतही घातली; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पिंपरी-चिंचवडमधील मोशी इथे ही घटना घडली. पिंपरी-चिंचवडमधील मंत्रा सोसायटीची गणेश विसर्जनाची मिरवणूक सुरु होती. गणरायाला निरोप देताना मिरवणुकीत सर्व सोसायटीचे सदस्य ढोल-ताशाच्या गजरात बेधुंद होऊन नाचत होते. याचवेळी ही मिरवणूक सोसायटीतील इतर सदस्य पाहत होते.
Sanjay Raut : इथे लोकशाहीची हत्या अन् ‘घाना’ मध्ये लोकशाहीवर प्रवचन; राऊतांचा नार्वेकरांचा टोला
एकीकडे मिरवणूक सुरु होती, या मिरवणूक सोहळा पाहण्याचा आनंद सोसायटीमधील चार वर्षीय चिमुकलाही घेत होता. चिमुकला पाण्याच्या टाकीजवळ उभा राहुन ही मिरवणूक पाहत होता. त्याचवेळी चिमुकला अचानक पाण्याच्या टाकीत पडला. लेझीम तालावर सर्व सदस्य नाचत असल्याने कोणाचंही या घटनेकडे लक्ष गेलं नाही.
16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लांबणीवर! सर्वोच्च न्यायालयानं पुढं ढकलली सुनावणीची तारीख
या घटनेत दुर्देवाने चार वर्षीय चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी इमारतीचं बांधकाम करणारा विकासक दोषी असल्याचं पोलिस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी सांगितलं आहे. कारण जर इमारतीच्या विकासकाने पाण्याच्या टाकीवर झाकण बसवले असते तर चिमुकल्याचा जीव गेला नसता, असंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, गणेशोत्सवानिमित्त काल सर्वत्र उत्साहाचं वातावरण असताना अनेक ठिकाणी गालबोट लागल्याच्या समोर आलं आहे. नाशिकमधील गोदावरी नदीत आणि वालदरी धरणाच्या दोन तरुण बुडाल्याची घटना घडली होती. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अनेक उपाययोजना राबवण्यात येतात मात्र, तरुणांकडून प्रशासनाच्या नियमांच उल्लंघन करण्यात येत असल्याचं दिसून येतं.