मुलुंडमध्ये मराठी महिलेला जागा नाकारली, हुज्जतही घातली; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मुंबई : मुलुंड पश्चिममधील एका सोसायटीत महाराष्ट्रीय असल्यानं जागा नाकारण्यात आल्याचा तृप्ती देवरुखकर (Trupti Devrukhkar) या एका महिलेनं केला होता. त्या मुलुंडमधील एका सोसायटीत ऑफिससाठी जागा शोधण्यासाठी गेली असता परप्रांतीय व्यक्तीन जागा देण्यास नकार दिल्याचा प्रकार बुधवारी घडला. या प्रकारामुळं मुलुंड परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. या महिलेनं गुरूवारी मध्यरात्री मुलुंड पोलिस (Mulund Police) ठाण्यात तक्रार दाखल केली केली. त्यानंतर पोलिसांनी पिता-पुत्रावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
मुलुंड पश्चिम येथील शिवसदन इमारतीत बुधवारी ही घटना घडली. पीडित महिला तृप्ती देवरुखकर या आपल्या पतीसोबत कार्यालयाकरता जागा शोधण्यासाठी या सोसायटीत गेल्या होत्या. यावेळी सोसायटीचे सचिव प्रवीण ठक्कर आणि त्यांचा मुलगा नीलेश ठक्कर यांनी आम्ही मराठी माणसांना जागा देत नाही, असं सांगितलं.
Nitin Gadkari : ‘निवडणुकीत पोस्टर, बॅनरबाजी अन् चहापाणी करणार नाही’; नितीन गडकरींचं मोठं विधान
यातून वाद वाढला व देखरूखकर यांनी त्या बाचाबाचीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शुट करायला सुरूवात केली. महिलेनं या संपूर्ण घटनेचे मोबाईलमध्ये चित्रण केले. मात्र, त्यावरूनही या बापलेकांना अरेरावी करत त्यांचा मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण महिलेनं सोशल मीडियावर टाकल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. मनसे कार्यकर्त्यांनी तातडीने त्याची दखल घेतली.
त्यांनी संबंधित व्यक्तींशी संपर्क साधून जाब विचारला. अखेर या दोघांनी महिलेची माफी मागितली.
काय म्हणाले राज ठाकरे?
मुंबईत मुलुंडमध्ये, एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारली. इतरांनी निषेध केला. मात्रई, माझ्या मनसैनिकांना आमच्या पध्दतीने दम दिल्यावर बिल्डिंगच्या सचिनावे माफी मागिलती. अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. मुंबई, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
दरम्यान, तृप्ती देवरुखकर यांनी गुरुवारी रात्री मुलुंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून रात्री पिता-पुत्राला अटक केली. यानंतर दोघांची जामिनावर सुटका करण्यात आली.