Download App

धक्कादायक! गुगल मॅपवर बालेवाडीतील क्रीडा संकुलाच्या नावात ‘औरंगजेब’; प्रकरण पोलीस ठाण्यात..

पुण्यातील बालेवाडी म्हाळुंगे येथील क्रीडा संकुलाचे नाव गुगल मॅपवर 'छत्रपती औरंगजेब आलमगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स' असे नाव दिसून येत आहे.

Pune News : पुण्यातील बालेवाडी म्हाळुंगे येथील क्रीडा संकुलासंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या क्रीडा संकुलाचे नाव गुगल मॅपवर बदलल्याचे दिसत आहे. गुगल मॅपवर ‘छत्रपती औरंगजेब आलमगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स’ असे नाव दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा खोडसाळपणाचा प्रकार लक्षात आल्यानंतर पुणे मनपा नगरसेवक अमोल बालवडकर यांनी लागलीच पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना निवदेन देत या प्रकरणातील दोषींना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करा, अशी मागणी बालवडकर यांनी केली आहे.

याबाबत बालवडकर यांनी बाणेर पोलिसांत निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की बालेवाडी म्हाळुंगे येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या संदर्भात गुगल लोकेशन मॅपवर काही समाजकंटकांनी जाणूनबुजून छत्रपती औरंगजेब आलमगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असे नाव बदलले आहे. या प्रकारामुळे शिवप्रेमी, खेळाडू आणि नागरिकांच संतापाची लाट उसळली आहे.

हगवणे कुटु्ंबियांना मकोका लागणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं..

गुगल मॅपमध्ये गेल्यानंतर लोकेशन एडीट केल्याचे दिसते. अशा प्रकारे नाव बदलून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तंत्रज्ञानाचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जात आहे. अशा प्रकारे गुगल मॅपच्या एडीटचा पर्याय वापरुन इंटरनेटवरील हॅकर्स इतरही अनेक गुन्हे करु शकतात. त्यामुळे या प्रकाराची गांभर्याने दखल घेऊन अशा प्रकारांचा वेळीच बंदोबस्त करावा.

Virtual Private Network वापरुन अशा प्रकारचे गुन्हे केले जात असावेत अशीही शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषींना तातडीने शोधून त्यांच्यावर कारवाई करावी. संबंधित लोकेशन मॅपवरील नाव बदलून पहिल्यासारखे करावे अशी मागणी या निवेदनात नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केली आहे. दरम्यान, इंटरनेटचा वापर अशा पद्धतीने होत असल्याचेही या प्रकाराने समोर आले आहे.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण राहिलं बाजूला; चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्येच जुंपली

follow us