वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण राहिलं बाजूला; चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्येच जुंपली

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण राहिलं बाजूला; चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्येच जुंपली

Rupali Chakankar Press on Vaishnavi Hagavane Death : पदरात 9 महिन्यांचं बाळ असलेल्या वैष्णवीने सासरच्या लोकांच्या छळाला, मारहाणीला, पैशांच्या मागणीला कंटाळून गेल्या आठवड्यात तिचं जीवन संपवलं. याप्रकरणामुळे राज्यभरातील नागरीक संतापले आहेत. (Vaishnavi) याप्रकरणात फरार असलेले वैष्णवीचे सासरे आणि दीर यांना अटक झाली. तिचे पती, नणंद आणि सासू आधीच पोलिसांच्या ताब्यात आहेत. दरम्यान, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं.

वैष्णवी हगवणे हिच्या जाऊबाईने जेव्हा तक्रार दिली तेव्हा जर महिला आयोगाने दखल घेतली असती तर वैष्णवीचा जीव वाचला असता असं म्हणत रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावरच गन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसंच, यावर बोलताना रोहिणी खडसे यांच्या पीएची माझ्याकडं तक्रार आली आहे. त्यामुळे ज्यांच्या दिव्याखाली अंधार आहे त्यांनी दुसऱ्यावर बोलू नये. आम्ही आमच्या स्वकर्तृत्वाने इतपर्यंत आलो आहेत असा पलटवार रुपाली चाकणकर यांनी केला.

 

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज वैष्णवीच्या आई-वडिलांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषदेत या संपूर्ण प्रकरणाबद्दल प्रतिक्रिया देत भूमिक मांडली. वैष्णवी संदर्भात आयोगाकडे तक्रार नव्हती. पण आयोगाने स्वत: स्युमोटो घेऊन या घटनेला वाचा फोडली. या प्रक्रियेत तपास अधिकाऱ्याने चांगला तपास केला आहे असे त्यांनी नमूद केलं.

वैष्णवी संदर्भात आयोगाकडे तक्रार नव्हती. पण आयोगाने स्वत: स्युमोटो घेऊन या घटनेला वाचा फोडली. या प्रक्रियेत तपास अधिकाऱ्याने चांगला तपास केला आहे. या सर्व घटनेत अधिक गुन्हे दाखल करण्याची मागणी पालकांनी केली आहे. पोलिसांना तशा सूचना दिल्याचे चाकणकर म्हणाल्या.

पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती; हुंड्याच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवलं

हुंडाबंदीच्या विरोधातील कायदा आहे. गर्भनिदानचा कायदा आहे. तरीही असे गुन्हे का घडतात. नागपूरमध्येही काल हुंड्यासाठी एका महिलेने आत्महत्या केली. हुंडा मागितल्याने मुली आत्महत्या करत आहेत. 35,971 केस माझ्या मुख्य कार्यालयात आल्या आहेत, त्यापैकी 35282 निकाली काढल्या आहेत.

आयोग काय करतो असं लोकांना वाटतं त्यांच्यासाठी हा डेटा आहे. मला हे सांगायची गरज नव्हती. पण गेल्या दोन दिवसात चिल्लरचा मोठा आवाज आला त्यामुळे उत्तर द्यावे लागते, असं म्हणत चाकणकरांनी नाव न घेता रोहिणी खडसे यांना टोला लगावला. रोहिणी खडसे यांनी चाकणकरांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.  तसंच, जे लोकं आयोगाशी संबंधित नाही. त्यांना प्रश्न विचारल्यावर ते मोठी उत्तर देतात. त्यांना पुरेशी माहिती नसते. त्यामुळे तुम्ही आयोगाला माहिती विचारा, असंही त्या म्हणाल्या.

यशोमती ठाकूर या माजी महिला मंत्री आहेत. मला त्यांना सांगायचं आहे, त्या माजी मंत्री आहेत, त्यांनी जबाबदारीने बोललं पाहिजे. काल सहा दिवसानंतर भानावर आल्यावर त्यांनी ट्विट केलं. ठाकूर यांच्या कार्यकाळात जे काम झालं. त्यांच्यापेक्षा राज्य महिला आयोग चांगले काम करत आहे, असे सांगत चाकणकरांनी त्यांना टोला लगावला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube