Download App

ब्रेकिंग : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! मिळकत करात 40 टक्के सुट राहणार कायम; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

  • Written By: Last Updated:

Pune News : पुणेकरांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. ४० टक्के मिळकतकराची सवलत कायम राहणार असून, येणाऱ्या पहिला कॅबिनेट  बैठकीमध्ये प्रस्ताव आणून मान्यता देणार असल्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत  घेण्यात आला आहे.

ट्रोलर्सकडून सरन्यायाधीशही सुटले नाहीत, खासदारांचे राष्ट्रपतींना पत्र

पुणे महापालिकेमार्फत स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असल्यास घरपट्टीमध्ये ४० टक्के सवलत मिळत होती. ही सवलत पुन्हा सुरू करण्याबाबत पुणेकर नागरिकांची असलेली मागणी लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज विधान भवन येथे बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून पुढील मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचा सूचना देण्यात आल्या. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुणे महानगरपालिका माजी महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.

राज्य शासनाने सन २०१९ मध्ये महानगरपालिकेचा ठराव विखंडन करुन घरपट्टीमध्ये देत असलेली ४० टक्के सवलत रद्द करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. सदर निर्देश रद्द करून पुणे महापालिका हद्दीत मिळकत करात पुणेकरांना यापूर्वी देण्यात येणारी ४० टक्के सवलत पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी पुणेकर नागरिकांची मागणी आहे. याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

पुणेकर नागरिकांचा हा प्रश्न सोडविण्याबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. लवकरच यावर अंतिम निर्णय होईल आणि पुणेकर नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. त्यांनी या प्रश्नाबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत.

 

Tags

follow us