ट्रोलर्सकडून सरन्यायाधीशही सुटले नाहीत, खासदारांचे राष्ट्रपतींना पत्र

ट्रोलर्सकडून सरन्यायाधीशही सुटले नाहीत, खासदारांचे राष्ट्रपतींना पत्र

मुंबई : सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा अद्याप बाकी असून त्याआधीच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना ट्रोलर्स आर्मीकडून ट्रोल करण्यात येत आहे. यासंदर्भात राज्यसभेच्या खासदारांकडून या ट्रोलर्स आर्मीची तक्रार करण्यात आली आहे. खासदारांनी या ट्रोलर्स आर्मीवर कारवाई करण्याची मागणी पत्राद्वारे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे.

राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर झाली. राज्यात कोण वरचढ ठरणार? हे या सुनावणीनंतर घोषित होणार आहे. सत्तासंघर्षाची सुनावणी झाली मात्र, निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. मुख्य सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली असून सध्या ट्रोल आर्मीकडून सरन्यायाधीश चंद्रचूड यांना ट्रोल केलं जात आहे.

पुणे ब्रेकिंग : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! मिळकत करात 40 टक्के सुट राहणार कायम; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

यासंदर्भात चंद्रचूड यांच्याविरोधात ट्रोलर्सची आर्मी सक्रिय झाल्याचा आरोप राज्यसभेच्या विरोधी पक्षांच्या खासदारांनी केला आहे. याबाबतचे एक पत्रच खासदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलंय. तसेच तथाकथित ट्रोलर्स हे राज्यातील सत्ताधारी पक्षातले असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विशेषत: कॉंग्रेसचे राज्यसभा खासदार आणि वकील विवेक तन्खा यांच्या पुढाकाराने विविध पक्षातील खासदारांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे.

सत्तासंघर्षाच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी काही टीका-टिपण्या केल्या होत्या. त्यानंतर ट्रोलर्स आर्मीकडून सरन्यायाधीश चंद्रचूड यांना ट्रोल करण्यात येत असल्याचा आरोप विरोधी खासदारांनी केला आहे. या ट्रोलर्सवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही पत्राद्वारे करण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या हितासाठी शहबाज शरीफ-इम्रान खान यांचं मोठं विधान…

अॅटर्नी जनरल आर व्यकटरामांनी यांनाही विरोधी पक्षाच्या खासदारांनी पत्र लिहुन कारवाईची मागणी केली आहे. फक्त ठाकरे गटाच्याच खासदारांनी नाहीतर इतर पक्षांच्या खासदारांनी पत्रावर सह्या केल्या आहेत. सत्ताधारी सरकारला ही ट्रोल आर्मी सहानूभुती मिळवून देत आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याविरोधात सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या पोस्टला मोठ्या प्रमाणात दर्शक मिळत आहेत.

Ajit Pawar : ज्या-ज्यावेळी…; अजित पवारांनी शिंदेंना करून दिली राजीनाम्याची आठवण

राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही. न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदाचा मान ठेवणं गरजेचं आहे. जे लोकं असं ट्रोल करत आहेत त्यांच्यावर कारवाई करा, पण त्यांना जे पाठिंबा देत आहेत त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात लवकरात लवकर लक्ष देऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणीही खासदारांनी केली आहे. खासदार विवेक तनखा, रामगोपाल यादव, प्रियंका चतुर्वेदी, दिग्विजय सिंग, प्रताप सिंग या खासदारांनी आर्मी ट्रोलर्सवर कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, राज्यात सरन्यायाधीशांनाच ट्रोल केलं जात याची नोंद या खासदारांनी घेतली आहे. राज्यातील रोलिंग पार्टी अर्थात शिंदे-फडणवीस सरकार या ट्रोल आर्मीला पाठिंबा देत असल्याचा आरोपही खासदारांकडून करण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube