लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

केसरीचे विश्वस्त संपादक आणि लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक (Deepak Tilak) यांचे आज पहाटे वृ्द्धापकाळाने निधन झाले.

Deepak Tilak

Deepak Tilak

Deepak Tilak Passes Away : केसरीचे विश्वस्त संपादक आणि लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक (Deepak Tilak) यांचे आज पहाटे वृ्द्धापकाळाने निधन झाले. त्यांचे पार्थिव शरीर आज सकाळी 8 ते 11 या वेळेत अंत्यदर्शनासाठी टिळक वाड्यात ठेवण्यात येणार आहे. यानंतर दुपारी बारा वाजल्यानंतर पु्ण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दीपक टिळक यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

दीपक टिळक यांनी महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम केले होते. शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक कार्यात त्यांचे मोठे योगदान होते. टिळक कुटुंबाचा सामाजिक कार्याचा वारसा दीपक टिळक यांनी समर्थपणे पुढे चालवला. दीपक टिळक अनेक सामाजिक संघटनांशीही जोडले गेले होते. सन 2021 मध्ये दीपक टिळक यांना जपानी भाषेच्या प्रसारासाठी केलेल्या कार्याबद्दल जपान सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून त्यांना सन्मानित करण्यात आले होते. लोकमान्य टिळक पुरस्काराचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.

सुधा मूर्तींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर, 1 ऑगस्टला होणार महाराष्ट्र सदनात गौरव

अजित पवारांकडून श्रद्धांजली अर्पण

दीपक टिळक यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दीपक टिळक यांना श्रद्धांजली वाहिली. केसरी’चे विश्वस्त संपादक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांनी शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक कार्य या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले. टिळक कुटुंबाच्या सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी प्रामाणिकपणे पुढे नेत, ‘केसरी’सारख्या ऐतिहासिक दैनिकाच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, मूल्याधिष्ठित विचार आणि लोकशिक्षणाचा ध्यास जपला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. दीपक टिळक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, जपानी भाषेच्या प्रसारासाठी डॉ. दीपक टिळक यांनी केलेल्या कार्याची जपान सरकारनेही दखल घेतली होती. तसेच, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांचे कार्य हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी होते. ते एक विचारवंत, कुशल प्रशासक, संवेदनशील पत्रकार आणि समर्पित समाजसेवक होते. त्यांच्या जाण्याने पुणे शहराच्या सार्वजनिक जीवनात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशा शोकभावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या.

टिळक पुरस्कार वितरणाला शरद पवार हे उपस्थित राहणारच ! विरोध करणाऱ्यांना रोहित पवारांनी सुनावले

Exit mobile version