Download App

धक्कादायक! सांस्कृतिक पुण्यात सर्रासपणे बेकायदेशीर विदेशी तरूणींच्या ‘अरेबियन नाईट्स’ चं आयोजन

  • Written By: Last Updated:

Pune News : पुणे या शहराला (Pune News) राज्याची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पुण्यामध्ये देखील आता डान्सबारची (Dance Bar) छमछम सुरू झाली आहे. काही हॉटेल, पब चालकांनी ‘अरेबियन नाईट्स’ च्या नावाखाली विदेशी तरूणींच्या नृत्यांचे कार्यक्रम सुरू केले आहेत.

Raj Kumar Raoचा ‘विक्की विद्या का वो वाला व्हिडीओ’मध्ये करणार धम्माल

हे कार्यक्रम मद्यधुंद अवस्थेमध्ये रात्र आणि पहाटेपर्यंत नृत्य बेकायदेशीरपणे नियमांना धाब्यावर बसवून होत आहेत. त्यामध्ये विशेष म्हणजे या कार्यक्रमांच्या जाहिराती सोशल मीडियावर खुलेआम दिल्या जात आहेत. त्यामध्ये विविध ऑफर्स देऊन ग्राहकांना खेचून आणले जात आहे. त्यामुळे राज्याची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Pune News) आता नाईट कल्चर वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Sharad Pawar : रोहित पवारांच्या कंपनीवर कारवाई; शरद पवार म्हणाले, मी उत्तर..

दरम्यान या बेकायदेशीर कार्यक्रमांमध्ये अल्पवयीन मुल-मुलींना देखील सहज प्रवेश दिला जात आहे. तेथे तरूणाई बेधुंद होऊन मद्य रिचवत रात्री उशीरापर्यंत नाचत असतात. यासाठी काही ग्रुप्स देखील यासाठी काम करत आहेत. ग्राहकांना विदेशी तरूणींच्या नृत्याने आकर्षित केले जाते. दरम्यान हे कार्यक्रम पोलिसांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय आयोजित केले जाऊ शकत नाही. असं पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी सांगितलं आहे.

Hardik Joshi: राणादाचा नवा चित्रपट ‘क्लब 52’ येतोय भेटीला

पबमध्ये नाचणाऱ्या या तरूणी पर्यटन व्हिसावर भारतात येत आहेत. त्यामुळे त्यांना व्यावसाय करण्याची परवानगी नसते. मात्र हे हॉटेल्स आणि पबवाले. बेधकपणे त्यांच्या जाहिराती करून ग्राहकांना आकर्षित करत आहेत. त्यातून हायप्रोफाईल वेश्याव्यावसाय देखील फोफावत चालला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने नुकतच केलेल्या एका कारवाईतून समोर आले होते. त्यामुळे सामान्य नागरिकांना देखील याचा त्रास सहन करावा लागत असल्याने यावर कारवाई कधी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Tags

follow us