Raj Kumar Rao’विक्की विद्या का वो वाला व्हिडीओ’मध्ये करणार धम्माल

Vicky Vidya Ka Woh Wala Video Movie: बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव (Raj Kumar Rao) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘विक्की विद्या का वो वाला व्हिडीओ’ (Vicky Vidya Ka Woh Wala Video Movie) या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकुमारने आपलया दमदार अभिनय आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर मनोरंजन क्षेत्रात स्वत:चं अनोखं स्थान निर्माण केलं आहे.
A blast from the past!🫣 #RajkummarRao and #TriptiiDimri promise 90s nostalgia in #VickyVidyaKaWohWalaVideo!💿#VickyVidya #VVKWWV@RajkummarRao @tripti_dimri23 @writerraj #BhushanKumar #KrishanKumar #ShobhaKapoor #EktaKapoor @VipulDShahOpti @ashwinvarde @bahlrajesh @vklahoti… pic.twitter.com/oDPArFunhc
— T-Series (@TSeries) September 28, 2023
राजकुमार रावच्या नवनवीन सिनेमासाठी त्याचे चाहते मोठ्या आतुरतेने वाट बघत असतात. अशामध्ये त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी देण्यात आली आहे. अभिनेता राजकुमार राव गेल्या काही काही दिवसांत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सिनेमात बघायला मिळत असून आता त्याच्या खात्यामध्ये आणखी एका सिनेमाची भर पडली आहे. लवकरच राजकुमार ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’च्या माध्यमातून चाहत्यांच्या पुन्हा एकदा भेटीला येणार आहे.
‘ड्रीम गर्ल’ आणि ‘ड्रीम गर्ल 2’ चे दिग्दर्शन करणारे राज शांडिल्य हेच राजकुमारच्या या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेता राजकुमार रावच्या टी-सीरीजने सोशल मीडियावर सिनेमाचे एक जबरदस्त पोस्टर प्रदर्शित केले आहे. हे नवं कोरं पोस्टर शेअर करत असताना कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘भूतकाळातील एक धमाका.
Hardik Joshi: राणादाचा नवा चित्रपट ‘क्लब 52’ येतोय भेटीला
‘विकी विद्या का वो वाला व्हिडीओ’ या कौटुंबिक नाटकाद्वारे राजकुमार आणि तृप्ती ९० च्या दशकातील आठवणींना उजाळा मिळणार आहे. तर दुसरीकडे राज शांडिल्य यांनी देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘ड्रीम गर्ल 2′ नंतरचा हा त्याचा आगामी सिनेमा असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.’विकी विद्या का वो वाला व्हिडीओ’ या सिनेमाची कथा राज शांडिल्य यांनी लिहिली आहे. तर राज शांडिल्य यांच्याबद्दल सांगायचे झाले तर, ते एक प्रसिद्ध टेलिव्हिजन आणि उत्तम सिनेमा लेखक आहेत.