Download App

Pune News : 14 जानेवारीला महायुतीचा मेळावा; मुरलीधर मोहोळ यांनी सांगितला प्लॅन

Pune News : आगामी लोकसभा निवडणुकां अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता पुण्यातही सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहेत. अशातच येत्या 14 जानेवारीला पुण्यात महायुतीच्या राज्यस्तरीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याचं भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी सांगितलं आहे. नूकतीच पुणे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते.

Hindu Tan-Man Song: ‘मैं अटल हूं’मधील ‘हिंदू तन-मन’ नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

मुरलीधर मोहोळ म्हणाले, महायुतीचे सर्वच घटक पक्षाच्यावतीने राज्यातील 36 जिल्ह्यात येत्या 14 जानेवारीला कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. पुण्यातही 14 जानेवारीला मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याला पुण्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असून महायुतीच्या सर्वच घटक पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचं मोहोळ यांनी सांगितलं आहे.

एकमेकांना सल्ले दिल्याने दोघांचंही वाटोळं झालं; विखेंची ठाकरेंसह पवारांवर सडकून टीका

तसेच देशात एनडीए आणि राज्यात महायुतीचं सरकार जनतेच्या सेवेसाठी यशस्वी काम करीत आहे. त्यामुळेच सर्वांनी मिळून एकत्रित काम करण्याचा उद्देश महायुतीचा आहे. 14 जानेवारीच्या मेळाव्यानंतर 6 विभागांमध्येही मेळावे पार पडणार असून विभागीय मेळाव्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार असल्याचंही मोहोळ यांनी सांगितलं आहे.

‘नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला’; उद्धव ठाकरेंची विधानसभा अध्यक्षांवर सडकून टीका

दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन मजबूत करण्याबाबतही या मेळाव्यात चर्चा होणार असून दोन्ही मेळाव्याला महायुतीच्या सर्वच घटक पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यांच्या माध्यमातून विजयाचा संकल्प करण्यासाठी महायुतीचे पदाधिकारी एकत्र येत असल्याचंही ते म्हणाले आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीच्या 45 हून अधिक जागा मिळणार, असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी दर्शवला आहे. महाराष्ट्रातल्या सर्वच मतदारसंघात महायुतींच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्यात येत आहे. यावेळी पत्रकार परिषदेत भाजप नेते मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष धीरज घाटे, अजित पवार गट शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेना शिंदे गट शहराध्यक्ष नाना भानगिरे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

follow us