पेपरफुटीच्या प्रकारानंतर विद्यापीठाला जाग; बार्टी, महाज्योती, सारथी परीक्षा स्थगित…
Pune : महाज्योती, सारथी, बार्टी परीक्षेत पेपरफुटीचा प्रकार घडल्यानंतर आता सावित्रीबाई फुले विद्यापीठाला जाग आली आहे. या परीक्षेदरम्यान, सील नसलेले पेपर दिल्याने पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता. त्यानंतर आता विद्यापीठाकडून परीक्षेला स्थगिती देण्यात आली आहे.
‘जलसिंचन, शिखर बॅंक घोटाळ्यात मोदी, फडणवीस अजितदादांना वाचवतात’; शालिनीताईंचा आरोप
पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर काल सारथी, बार्टी आणि महाज्योती संशोधन संस्थांसाठी घेण्यात आली. या परीक्षेत झेरॉक्स प्रश्नपत्रिका दिल्याची माहिती मिळाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. यावेळी प्रश्नपत्रिकेतील सी आणि डी प्रश्नपत्रिकेला सील नसल्याचे दिसून आल्याचं विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आलं. या प्रकारामुळे विद्यार्थी चांगलेच संतापले होते. त्यांनी परीक्षा विभागाच्या कारभाराचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत परीक्षांवरच बहिष्कार टाकला. परीक्षा केंद्राबाहेर गोळा होत विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
“केवळ बैठकीला आले नाहीत म्हणून आमदार अपात्र ठरत नाहीत”! CM शिंदेंसह सर्व 16 आमदार पात्र
या प्रकरणी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी काही आरोपही केले. मात्र विद्यापीठाच्या सेट विभागप्रमुखांनी सर्व आरोप फेटाळून लावले. प्रश्नपत्रिका व्यवस्थित सील करूनच देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आमच्या बाजूने कोणतीही चूक झालेली नाही असा खुलासा विभागप्रमुखांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. यानंतर नागपूर शहरातही पेपर फुटीचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाल्याचं समोर आलं होतं.
Ram Mandir उद्घाटनाकडे चारही शंकराचार्यांनी फिरवली पाठ; ‘या’ कारणामुळे अयोध्येला जाणार नाही
नागपूर शहरातील कमला नेहरू परीक्षा केंद्रावर पीएचडी फेलोशिप परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेतही पेपर फुटल्याने विद्यार्थी संतप्त झाले. हजारो विद्यार्थ्यांनी परीक्षांवर बहिष्कार टाकत परीक्षा विभाागाच्या कारभाराचा निषेध केला. संपूर्ण परीक्षेचे पेपर आधीच फुटलेले होते. आम्हाला परीक्षेत झेरॉक्स कॉपी देण्यात आली असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. या अनागोंदी कारभाराविरोधात विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर आंदोलन सुरू केले होते.
दरम्यान, परीक्षांच्या पेपरफुटीचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याआधीही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एमबीए परीक्षेचा पेपर फुटला होता. हा प्रकार समोर येताच विद्यापीठाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आताही सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून या परीक्षेला स्थगिती देण्यात आली आहे.