Download App

Pune News : दुबईच्या प्रवाशाने अंडरवेअरमध्ये लपवली सोन्याची पावडर पण विमानतळावर..,

Image Credit: Letsupp

Pune News : पुणे विमानतळावर (Pune Airport) दुबईहुन आलेल्या एका प्रवाशाला सोन्याची तस्करी (Smuggled Gold) करताना अटक करण्यात आली आहे. सीमा शुल्क विभागाच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रवाशाने स्वत:च्या अंडरवेअरमध्ये सोन्याची पावडर लपवली होती. दरम्यान, या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. यासंदर्भातील एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे.

आता कोणीही ‘सिंगल’ राहणार नाही! जगात AI गर्लफ्रेंडची एन्ट्री; खास पद्धतीने दूर करते ‘पुरुषांचा एकटेपणा’

एअर इंटेलिजन्सच्या प्रसिद्धीपत्रकानूसार, दुबईच्या या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर त्याची झाडाझडती केली असता त्याच्या अंडरवेअरमध्ये 1356 ग्रॅम वजनाची सोन्याची पावडर आढळून आली आहे. दोन पाकीटात ही पावडर अंडरवेअरमध्ये ठेवण्यात आली होती. या सोन्याच्या पावडरची किंमत 73. 28 लाख रुपये इतकी आहे.

आधी ‘आमदार’ आता ‘डॉक्टर’! ‘कोरोना’तील कामाची दखल घेत आ. लंकेंना ‘डॉक्टरेट’ पदवी

याअगोदरच एअर इंटेलिजेंसच्या पथकाकडून 11 जानेवारीला एका प्रवाशाला अटक करण्यात आली होती. तोही प्रवासी दुबईहूनच पुणे विमानतळावर पोहोचला होता. याचवेळी त्याला एअर इंटेलिजन्सच्या पथकाने 150 ग्रॅम सोन्यासह अटक केली होती. हे सोने 9.64 लाख किमतीचे होते.

Maratha Reservation: जरांगेंची मुंबईकडे कूच; सरकारचा मराठा समाजाच्या सर्वेक्षणाबाबत मोठा निर्णय

तसेच एका महिला प्रवाशालाही 14 जानेवारी रोजी दुबईहून पुणे विमानतळावर आल्यानंतर लगेचच अटक करण्यात आली होती. या महिलेकडे कच्च्या सोन्याच्या बांगड्या आणि 153.56 ग्रॅम वजनाचे पेंडंट तसेच 2,400 सिगारेटच्या चार किलो वजनाच्या काड्या आढळून आल्या होत्या. या तिन्ही प्रकरणांचा पुढील तपास सुरू असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

follow us

वेब स्टोरीज