आता कोणीही ‘सिंगल’ राहणार नाही! जगात AI गर्लफ्रेंडची एन्ट्री; खास पद्धतीने दूर करते ‘पुरुषांचा एकटेपणा’
इंटरनेटच्या अविष्काराने जग जवळ आणले. अनेक गोष्टी सहज आणि सोप्या झाल्या. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) अर्थात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या जोरावर अशक्य गोष्टी शक्य झाल्या. बांधकामापासून ते लिहिण्यापर्यंत सर्वच गोष्टींमध्ये मानवाचे कष्ट कमी झाले. आता अशीच एक अशक्य गोष्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स शक्य करुन दाखविली आहे. ‘पुरुषांचा एकटेपणा’ दूर करण्यासाठी ‘एआय’मध्ये खास मॉडेल आले आहे. या मॉडेलच्या सौंदर्यामुळे आणि तिच्या वैशिष्ट्यांमुळे सध्या जगभरात याची चर्चा होत आहे.
Foxy AI नावाच्या कंपनीने हे खास एआय मॉडेल लाँच केले आहे. लेक्सी लव्ह असे तिचे नाव आहे. ही मॉडेल जगभरातील प्रमुख 30 भाषांमध्ये पुरुषांशी संवाद साधू शकते. भावनिक गोष्टींपासून कोणत्याही गोष्टी तुम्ही या मॉडेलसोबत शेअर करु शकता, ती तुमचे दुःख शेअर करु शकते, चॅटिंग करु शकते. तुम्हाला हवे असल्यास तुम्हाला तिचे फोटोही पाठवू शकते.
गयाहून रशियाला जाणारे Falcon 10 विमान कोसळले, 4 क्रू मेंबरसह 6 जण बेपत्ता
या मॉडेलची सर्वात खास गोष्ट म्हणजे ते माणसांप्रमाणेच भावना शेअर करते. त्या कोणत्याही प्रकारे बनावट किंवा आभासी वाटत नाहीत. याशिवाय लेक्सी दर महिन्याला 30 हजार डॉलर्स कमवत आहे. Foxy AI चे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम इमारा म्हणतात, ती चॅटिंगमध्ये इतकी चांगली आहे की ती तिच्या चाहत्यांना सहजपणे जाणवते की ती एआय मॉडेल नाही तर एक एक खरीखुरी व्यक्ती आहे.
विवेक रामास्वामी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नव्हे तर उपराष्ट्रपती होणार! ट्रम्प यांच्यासमोरच घोषणा
लेक्सीचे निळे डोळे तिच्या सौंदर्यात भर घालतात. सोबतच तिचे लांब मोकळे केस, तिचा सुडौल बांधा, तिच्या कपड्यांची स्टाईल आणि मनमोहक, मादक अदा पुरुषांना आकर्षित करतात. शिवाय आपल्याला हव्या असलेल्या भाषेत बोलत असल्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात त्याचे चाहते आहेत. मजेशीर गोष्ट म्हणजे पुरुषांचा एकटेपणा कसा दूर करायचा हे तिला चांगलेच माहीत आहे.