Pune News : राज्याच्या राजकारणात आज (Pune News) पुन्हा एक मोठी घडामोड घडली आहे. शरद पवार, अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अख्खं पवार कुटुंब एकत्र जमलं होतं. राष्ट्रवादीतील फाटफूट, निवडणूक आयोग अन् सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावण्या, आज सकाळीच अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट. यानंतर थेट अजितदादा आणि शरद पवार एकत्र आले. त्यामुळे त्यांच्या या भेटीची मोठी चर्चा सुरू झाली आहे. पवार कुटुंब नेमकं कशासाठी एकत्र आले होते याचे उत्तरही मिळाले आहे. शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या बाणेर येथील निवासस्थानी तसेच दिवाळी सणानिमित्त पवार कुटुंबिय एकत्र आले होते.
Sharad Pawar यांचा म्हाडा दौरा ‘या’ कारणामुळे रद्द, मात्र अजितदादा 50 मिनिटं आधीच लावणार हजेरी
शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या बाणेर येथील निवासस्थानी पवार कुटुंबिय एकत्र जमले होते. याआधी अजित पवार रक्षाबंधनाच्यावेळी आले नव्हते. त्यामुळे दिवाळीनिमित्त येणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. याआधी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर थोड्याच वेळात अजित पवार आणि शरद पवार प्रतापराव पवार यांच्या घरी एकत्र जमले होते. अजित पवार येण्याआधीच शरद पवार आणि सुप्रिया सुळे येथे पोहोचले होते. त्यानंतर आता अजित पवार भाऊबीजेला पुन्हा येणार का याचंही उत्तर लवकरच मिळणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पवार कुटुंबियांची ही पहिलीच दिवाळी आहे. याआधी पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान मोदी पुण्यात आले होते. त्यावेळीही अजित पवार आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर आले होते. मात्र, यावेळी या दोघांत काहीच चर्चा झाली नाही. अजित पवार यांनीही शरद पवार यांची नजर चुकवत तेथून काढता पाय घेतला होता. यानंतर आज पुन्हा एकदा दोन्ही नेते एकत्र जमले होते. त्यामुळे या भेटीत काही राजकीय चर्चा झाली का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. मात्र, यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असे शरद पवार यांनी सांगितले.
Pune News : ‘काटेवाडी’त घमासान! अजित पवार गटाने निवडणुकीत पैसे वाटले; भाजपाचा गंभीर आरोप
या भेटीनंतर अजित पवार दिल्लीला रवाना झाले. राजधानी दिल्लीत अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.