Download App

Pune News : माजी उपमहापौरांनी सोडवलं पुणे काँग्रेसचं टेन्शन; दिला सुपर फॉर्म्युला

Image Credit: Letsupp

Pune News : आगामी लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election) रणसंग्राम काही दिवसांत सुरु होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु असतानाच आता पुणे लोकसभेच्या जागेबाबत माजी उपमहापौर आबा बागुल (Aaba Bagul) यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना एक सुपर फॉर्मूला देऊन टेन्शनच मिटवलं आहे. बागुल यांनी वरिष्ठांना एक पत्र लिहुन जाहीर सभेत जनमताचा कौल घेऊन उमेदवार जाहीर करण्याची मागणी केली आहे. जनमताचा कौल घेतल्यानंतर पुणे लोकसभेची काँग्रेसकडे येणार असल्याचा विश्वासही बागुल यांनी व्यक्त केला आहे.

पंकजांच्या नेतृत्त्वाला शाहांचा कौल; वन टू वन चर्चेमुळे बीडमधील समीकरणं बदलणार

बागुल यांनी पत्रात म्हटले, “यंदा पुणे लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकणार आहे. त्यासाठी जाहीर सभा घेऊन जनमताचा कौल घेणं गरजेचं आहे. पक्षाकडून जाहीर सभा घेण्याबाबात मला निर्देश द्या. तसे झाल्यास पुणेकरांचा कौलही कळेल आणि निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाची वातावरण निर्मितीही होईल. आपण आता गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घेऊन जाहीर सभेच्या आयोजनासाठी निर्देश द्या आणि त्यानुसारच पुणे लोकसभेसाठी उमेदवार ठरवा, अशी विनंतीच बागुल यांनी पटोलेंना केली आहे. तसेच जर तेच ‘यशस्वी कलाकार’ पुन्हा लोकसभेसाठी दिल्यास निकालही नेहमीप्रमाणे ‘ यशस्वी’च लागेल. त्यामुळे आता गांभीर्याने विचार करून काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी जाहीर सभेतून पुणेकरांचा कौल घ्या, त्यानुसारच उमेदवार ठरवावा, असंही ते पत्रात म्हटले आहेत.

छत्रपती संभाजीनगर से मजलिस को भगाना है; भाषणाच्या सुरुवातीलाच शाहांनी डिवचलं

सर्वच राजकीय पक्षांकडून इच्छुकांकडून नावे मागविण्यात आली आहेत. कॉँग्रेस पक्षाने देखील पुणे लोकसभेसाठे इच्छुकांची नावे मागविली होती. यामध्ये शहराध्यक्ष, माजी आमदार, विद्यमान आमदार यांच्यासह माजी नगरसेवकांनी इच्छुक असल्याचे पक्षाला कळवले आहे. विशेष म्हणजे नव आमदार रवींद्र धंगेकर आणि आरजे संग्राम यांनी देखील उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे उमेदवारीच्या चर्चेत रंगत आली आहे.

पुणे लोकसभेची जागा मागील दीड वर्षांपासून रिक्त आहे. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणूक घेतली जाईल अशी अटकळ बांधली जात होती. भाजपामधील इच्छुकांनी देखील मोर्चे बांधणी सुरू केली होती. तसेच, कॉँग्रेसने महाविकास आघाडीमध्ये या जागेवर आपला दावा सांगितला होता. दरम्यान, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी देखील पुणे लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे कॉँग्रेसमध्ये चलबिचल झाली होती. त्यानंतर, राष्ट्रवादीचे देखील दोन गट पडले. त्यामुळे कॉँग्रेसचा मार्ग मोकळा झाला आहे.

काँग्रेसकडून कोण इच्छूक?
अरविंद शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश पदाधिकारी संजय बालगुडे, आमदार रवींद्र धंगेकर, माजी शहराध्यक्ष एड. अभय छाजेड, माजी आमदार अनंत गाडगीळ, दीप्ती चवधरी, माजी नगरसेवक आबा बागुल, गोपाळ तिवारी, प्रदेश महिला पदाधिकारी संगीता तिवारी, राजू कांबळे, मनोज पवार, यशराज पारखी, संग्राम खोपडे, मुकेश धिवर, दत्ता बहिरट, वीरेंद्र किराड, नरेंद्र व्यवहारे, दिग्विजय जेधे यांनी आपली नावे दिली आहेत.

follow us

वेब स्टोरीज