Pune News : दोन दिवसांपूर्वी पुण्यातील कोथरूड भागात एका युवकाला चार जणांनी बेदम मारहाण केली. गजा मारणे टोळीतील लोकांनी मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारावर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मारहाण करणाऱ्या तिघा जणांना ताब्यात घेतल्याचीही माहिती आहे. या प्रकारवर आता केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी (Muralidhar Mohol) प्रतिक्रिया दिली आहे. घटना नेमकी काय होती? युवकाला मारहाण का झाली? यावरही त्यांनी उत्तरे दिली. तसेच पुणे पोलिसांनाही धारेवर धरले.
मोहोळ प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, दोन दिवस मी पुण्यात नव्हतो. दोन दिवसांपूर्वी हा सगळा प्रकार घडला आहे. देवेंद्र नावाचा जो कार्यकर्ता आहे तो काही माझ्या कार्यालयात काम करत नाही. पण भारतीय जनता पार्टीचा तो एक कार्यकर्ता आहे. अनेक वर्षांपासून तो पक्षात काम करतोय. कोथरुड येथील एका चौकात जायला जागा मिळाली नाही म्हणून त्याने फक्त विचारणा केली तर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. मी याबाबत पोलिसांशी बोललो आहे. मी माझ्या शहरात असले प्रकार आजिबात चालू देणार नाही. मारहाण करणारे जे चार लोक होते त्यांना लवकरात लवकर पकडले पाहिजे. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. माझ्या माहितीनुसार पोलिसांनी काही लोकांना पकडलेही आहे.
पुण्यात गुंडाराज, गजा मारणेच्या टोळीनं पुन्हा तरूणाला बेदम मारलं; पोलीस अधिकारी काय म्हणतात?
एक सुसक्षित मुलगा आयटी इंजिनिअर. त्याला वाहतूक कोंडीतून जाण्यासाठी जागा मिळत नव्हती म्हणून विचारणा केली तर मारहाण होते. फक्त देवेंद्रच नाही तर पुण्यातील कोणत्याही भागातील कोणताही तरुण असो त्यांच्यासाठी सुद्धा पोलिसांनी अशीच कठोर भूमिका घेतली पाहिजे. त्यामुळे या मारहाणीच्या घटनेत जे सहभागी आहेत त्या कुणालाही पोलिसांनी सोडू नये तसेच अशा लोकांना वाचवायला कुणी येत असेल तर त्यांनाही सोडू नये.
पुणे पोलिसांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. शहराची संस्कृती वेगळी आहे. पुण्याचं नाव खराब होता कामा नये ही पोलिसांची सुद्धा जबाबदारी आहे. सोशल मीडियावर रिल्स बनवण्याचे प्रकार थांबले पाहिजेत. नाहीतर आमच्या पद्धतीने आम्ही काम करू असा इशारा मुरलीधर मोहोळ यांनी दिला.
गजा मारणे टोळीवर प्रतिबंधात्मक कारवाई होणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मला नावाचं काही देणंघेणं नाही. पण ज्या चार लोकांनी मारहाण केली आहे. त्या चार लोकांना सोडायचं नाही इतकेच मी सांगितले आहे असे मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष बदलाताच धंगेकरांना जोरदार धक्का; शिंदेंची भेट घेणं भोवलं? नव्या टीममधून पत्ता कट