प्रदेशाध्यक्ष बदलाताच धंगेकरांना जोरदार धक्का; शिंदेंची भेट घेणं भोवलं? नव्या टीममधून पत्ता कट

पुणे : काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलताच माजी आमदार रविंद्र धंगेकरांना (Ravindra Dhangekar) मोठा धक्का बसला असून, शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांनी नव्याने नियुक्त केलेल्या टीममधून धंगेकरांना पत्ता कट केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असूनयेत्या महापालिका निवडणुकांमध्ये याचा काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी नवी टीम जाहीर केली आहे. (Ravindra Dhangekar Name Remove From List)
“एक मत मिळवलं अन् वाजपेयींचं सरकार पाडलं..”, शरद पवारांनी पहिल्यांदाचा केला खुलासा
नव्या टीममध्ये कोण कोण?
आगामी काळात पुणे महापालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यापार्श्वभूमिवर ही नवी टीम जाहीर करण्यात आली असून, अरविंद शिंदे यांनी जाहीर केलेल्या टीममध्ये बाळासाहेब शिवरकर, अविनाश बागवे, सुनिल शिंदे, संजय बालगुडे, दीप्ती चौधरी, अभय छाजेड, सुनिल यादव यांचा समावेश करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदेंची भेट घेणं धंगेकरांना भोवलं?
काही दिवसांपूर्वी कामानिमित्त माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता महापालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या नव्या टीममध्ये धंगेकरांना डावलण्यात आले असून, शिंदेंची भेट घेण धंगेकरांना महागात पडलं का? अशी चर्चा यामुळे सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी धंगेकर यांनी मुंबईत जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर ऑपरेशन टायगरमध्ये धंगेकर यांच्या नावाचीही चर्चांना उधाण आले होते. त्यामुळेचं धंगेकर यांना नव्या टीममधून वगळण्यात आल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे.
काँग्रेसमध्ये दोन गट
पुणे शहर काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अरविंद शिंदे यांचा एक गट तर, दुसरा गट धंगेकरांचा असल्याचे समोर आल्याचे चित्र पाहण्यास मिळत होते. त्याशिवाय मोहन जोशींचा वेगळा गट अशी जी चर्चा होती ती आता या यादीमुळे खऱ्या असल्याचे या यादीमुळे अधोरेखित होताना दिसून येत आहे.