मोहन जोशींना खासदार करणार का?; अरविंद शिंदे म्हणाले…

मोहन जोशींना खासदार करणार का?; अरविंद शिंदे म्हणाले…

Congress Leader Arvind Shinde On Pune Loksabha Bypoll :  पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. अद्याप निवडणुक आयोगाने पोटनिवडणूकन जाहीर केलेली नाही. पण महाविकास आघाडीतील पक्षांकडून पुणे लोकसभेच्या जागेवर दावा करण्यात येतोय. यावरुन महाविकास आघाडीमध्ये सुंदोपसुंदी सुरु झालेली दिसून येते आहे.

पुणे लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये रस्सीखेच पहायला मिळते आहे. पुण्याची लोकसभेची जागा ही परंपरागत काँग्रेस लढवते. पण यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस या जागेसाठी आग्रही असल्याचे दिसते आहे. यावर आता पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी भाष्य केले आहे. पुणे शहराची लोकसभेची जागा ही परंपरागत काँग्रेस पक्षच लढवतो. महाविकास आघाडीकडून ही निवडणूक लढवली जाईल. महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाचा उमेदवार दिला जाईल, असे शिंदे म्हणाले आहे.

Video : ‘सिर्फ एक बंदा काफी है’ मनोज वाजपेयीची लढाई

रवींद्र धंगेकर हे कसब्याच्या पोटनिवडणुकीत आमदार झाले आहे.  2019 साली मोहन जोशी यांनी काँग्रेसकडून पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवली होती. यावेळी आता पोटनिवडणुकीत जोशी यांना उमेदवारी मिळणार का, असा प्रश्न शिंदे यांना विचारला असता त्यांना नो कॉमेंट्स असे उत्तर दिले आहे.

त्यामुळे आता काँग्रेसपक्षामध्ये देखील लोकसभेच्या उमेदवारीवरुन रस्सीखेच सुरु झाल्याचे बोलले जात आहे. अरविंद शिंदे यांना तुम्ही उमेदवारीसाठी इच्छूक आाहात का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी थेट उत्तर देणे टाळले आहे. तसेच आमच्याकडे अनेक सक्षम उमेदवार आहेत. कुणालाही उमेदवारी दिली तरी शहराचा अध्यक्ष म्हणून त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी माझी असेल, असे ते म्हणाले.

Pune Loksabha : जगदीश मुळीक लोकसभेत जाणार? पक्षाकडे बोट दाखवत लावली उमेदवारीसाठी फिल्डिंग

दरम्यान, याआधी जयंत पाटील यांनी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासाठी पुणे लोकसभेची जागा आम्ही काँग्रेसकडून मागू असं म्हटलं होतं. अजित पवार यांनीही ज्याची ताकद जास्त त्यांनी जागा लढवावी असं वक्तव्य केलं होतं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube