पुण्यात गुंडाराज, गजा मारणेच्या टोळीनं पुन्हा तरूणाला बेदम मारलं; पोलीस अधिकारी काय म्हणतात?

Gaja Marne Gang Attacks On Youth In Pune : पुण्यातील (Pune) कुख्यात गुंड गजा मारणे टोळीची दादागिरी पुन्हा वाढली असल्याचं समोर आलंय. गजा मारणेच्या (Gaja Marne) टोळीनं आणखी एकाला मारहाण केल्याची घटना पुण्यात घडली. भररस्त्यात तरूणाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचं समोर आलंय. यावर पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांची प्रतिक्रिया समोर आलीय.
एक पाऊल पुढे… नाट्यमहोत्सवाचे आयोजन कौतुकास्पद; वामन केंद्रे
यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधताना पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितलं की, शिवजयंतीच्या दिवशी 19 तारखेला कोथरूडच्या एका चौकात कार्यक्रम सुरू होता. त्याठिकाणी ट्राफिक देखील जाम झाली (Pune Crime News) होती. त्या ठिकाणी फिर्यादी चालला होता, त्याठिकाणी त्याचा धक्का लागला. लगेच तिथे चार लोकं आले अन् त्याला मारहाण केली. यासंदर्भात माहिती मिळाली की, हे सर्व आरोपी गजानन मारणे यांच्या टोळीशी संबंधित होते.
मारणे टोळीतील तिघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली असून (Pune News) एका आरोपीचा शोध सुरू आहे.कुख्यात गुंड गजा मारणेचा भाचा फरार असून पोलिसांकडून शोध सुरू आहे. कोथरूडमधील एका व्यक्तीला गाडीचा धक्का लागला म्हणून मारहाण केली आहे. शिवजयंतीच्या दिवशी कोथरूडमध्ये गर्दीच्या ठिकाणी देवेंद्र जोक यांना दुचाकी वरून जात असताना चार लोकांनी मारहाण केली होती. त्यांनी जोगिनी कोथरूड पोलिसांत तक्रार दाखल (Crime News) केली होती. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
चार आरोपींपैकी तिघांना कोथरूड पोलिसांनी अटक केली, तर एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे. कोथरूड पोलिसांनी मारहाणीची सर्व माहिती घेत गुन्हा दाखल केलाय. गुन्हा दाखव करण्यास विलंब केला नाही, असं पोलीस उपायुक्त यांनी सांगितलंय. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेचार ते पावणेपाचच्या सुमारास घडली होती.
या सर्व आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. ओम जिज्ञासू, किरण पडवळ, बाबू पवार, अमोल तापकीर अशी आरोपीचीं नावे आहेत. या तीनही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. याअगोदर या आरोपींनी केलेले गुन्हे गजा मारणे टोळीशी संबंधित होते. या आरोपींचा कुख्यात गुंड गजा मारणे याच्याशी संबंध आहेत. त्या अंगाने पोलीस तपास करत आहेत. गजा मारणेच्या टोळीच्या वाढत्या दादागिरीमुळे पुन्हा नागरिकांत दहशतीचं वातावरण आहे.