Download App

आंदेकर-कोमकर हत्या अन् टोळीयुद्ध; प्रशासनाकडून आंदेकरच साम्राज्य उध्वस्त

Pune Police यांनी कोमकर हत्येनंतर टोळीयुद्ध भडकू नये म्हणून पोलिस सतर्क झाले आहेत. आंदेकरच साम्राज्य उध्वस्त करण्यासाठी प्रशासन आक्रमक झालं आहे.

  • Written By: Last Updated:

Pune Police aggressive after Aayush Komkar Murder Andekar’s empire destroyed : गणपती विसर्जनाच्या आदल्या रात्री पुण्यातील नाना चौकात 20 वर्षाच्या आयुष गणेश कोमकरची (Ayush Komkar) अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. आयुष कोमकरच्या हत्येला वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून पाहिलं जात आहे. त्यानंतर या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर देखील टोळीयुद्ध भडकू नये. यासाठी पोलिस अधिक सतर्क झाले आहेत.

आंदेकरच साम्राज्य उध्वस्त करण्यासाठी प्रशासन आक्रमक

पुण्यातील वनराज आंदेकर आणि आयुष कोमकरच्या हत्येनंतर टोळीयुद्ध भडकू नये. यासाठी पोलिस अधिक सतर्क झालेत असून गणेश पेठेतील मासळीबाजारावर पुणे पोलिस आणि महापालिकेने मोठी अतिक्रमण कारवाई केली आहे. बंडू आंदेकरच साम्राज्य उध्वस्त करण्यासाठी प्रशासन आक्रमक आणि आंदेकरचा प्रमुख आर्थिक स्त्रोत असलेल्या नागझरी नाल्यावर भरणाऱ्या बेकायदा मासळी बाजारावर पोलिस अन महापालिकेला लिहीलेल्या पत्रानंतर कारवाई करण्यात आली आहे.

PM मोदींना मी दुश्मन मानत नाही, पण..,; उद्धव ठाकरेंकडून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा..

मासळी बाजाराची इमारत असतानाही आंदेकरच्या आशिर्वादाने नाल्यात अतिक्रमण करून बेकायदा मासळी बाजार चालवला जात होता. या मासळी बाजारातून आंदेकरला मोठा आर्थिक फायदा मिळत होता. ज्यावर त्याचं साम्राज्य उभं राहिल होतं, मात्र कुठलीही पुर्वसुचना न देता कारवाई केली असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला असून , या कारवाईच्या वेळी नागझरी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

नेमकं प्रकरणं काय?

गणपती विसर्जनाच्या आदल्या रात्री पुण्यातील नाना चौकात 20 वर्षाच्या आयुष गणेश कोमकरची अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. आयुष कोमकरच्या हत्येला वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळे पुण्यातील टोळीयुद्धाने पुन्हा एकदा तणाव निर्माण केला आहे. 5 सप्टेंबर रोजी, गणेश विसर्जनाच्या आदल्या रात्री सुमारे आठ वाजता, पुण्यातील नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्स परिसरात दोन मारेकऱ्यांनी आयुषवर गोळीबार केला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

राज्यात इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सीचे भाडेदर अन् नियमावली जाहीर! जाणून घ्या अटी अन् शर्थी

सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोरांची ओळख पटली असून (Pune) त्यांची नावे यश पाटील आणि अमित पाटोळे अशी आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आयुष आपल्या क्लासवरुन घरी परतत असताना गाडी (Ayush Komkar) पार्क करत असताना या दोघांनी त्याच्यावर (Vanraj Andekar Case)गोळ्या झाडल्या. एकूण 9 गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. हल्ल्याच्या वेळी या मारेकऱ्यांनी धडाधड ओरडत होते की ‘इथे फक्त बंडू आंदेकर व कृष्णा आंदेकरच‘ आहेत.

‘महाराष्ट्रावर दहा लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर…’ संजय राऊतांनी थेट अजित पवारांचं नाव घेतलं

पोलिसांनी आयुषच्या आई कल्याणी कोमकर यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला. तपासात सीसीटीव्ही फुटेजद्वारे हल्लेखोरांची ओळख पटली आहे. त्यानंतर पुणे (Pune Crime News) पोलिसांनी आंदेकर आणि कोमकर कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणात सुमारे 13 जणांचा समावेश आहे. बंडू आंदेकर हा टोळीचा प्रमुख असून, मागील वर्षी वनराज आंदेकर, जो बंडू आंदेकरांचा मुलगा होता, याची हत्या झाली होती. यामध्ये बंडू आंदेकर, स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, वाडेकर आई आणि आणखी दोघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आंदेकर टोळीतील चौघा जणांना गुजरातमधून अटक करण्यात आली आहे.

follow us