Pune Police Commissioner’s big decision to destroy Bandu Andekar’s gang : गेल्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये पुन्हा एकदा टोळी युद्धातून खून झाला. पुण्यातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Aandekar Murder) खून प्रकरणातील आरोपीच्या भावाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडलीयं. भर रस्त्यावरच ही हत्या घडल्याने एकच खळबळ उडाली होती. गुंड बंडू आंदेकरच्या टोळीने ही हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
आंदेकरची टोळीबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय!
वनराज आंदेकर (Vanraj Aandekar Murder) खून प्रकरणानंतर या हत्येचा बदला घेण्यासाठी आतापर्यंत 4 हत्या करण्यात आल्या आहेत. त्यात पहिल्या हत्येनंतरच टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरला पोलिसांनी तुरूंगात टाकलेलं मात्र तुरूंगात असताना देखील बंडू आंदेकर हा टोळी चालवत असल्याचं त्यानंतर झालेल्या 3 हत्यांमुळे स्पष्ट झालं आहे.
फोटो काढताना दाखवलेली दोन बोटं ठरू शकतात तुमच्यासाठी धोक्याचे; तज्ज्ञांनी काय दिलाय इशारा
या पार्श्वभूमीवर आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी कारागृह प्रशासनाला पत्र लिहिलं आहे की, बंडू आंदेकरला कारागृहातच क्वारंटाईन करण्यात यावं. जेणे करून त्याला कुणी भेटू शकणार नाही. कारण तो त्याच्या टोळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जेलमध्ये त्याला भेटायला येणाऱ्या लोकांचा वापर करतो.
‘डॉन 3’ च्या वादानंतर रणवीर सिंगवर FWICE ची बंदी! 45 कोटींच्या नुकसानभरपाईचीही केली मागणी
तसेच त्याला इतर कैद्यांपासून देखील अलिप्त ठेवण्यात येणार आहे. जेणे करून तो टोळीच्या मार्फत करत असणारे गुन्हेगारी कृत्य पुर्णपणे रोखले जातील. यामध्ये आंदेकर जरी जेलमध्ये असला तरी देखील बाहेर टोळी धमक्या देणे, खून करणे हे प्रकार करतच आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासमाने हा मोठा निर्णय घेतला आहे.
