फोटो काढताना दाखवलेली दोन बोटं ठरू शकतात तुमच्यासाठी धोक्याचे; तज्ज्ञांनी काय दिलाय इशारा

Mobile selfie कॅमेरा समोर आला की, नकळत आपली दोन बोटे 'V' शेपमध्ये म्हणजेच पीस साइन दाखवण्यासाठी वर येतात..

  • Written By: Published:
फोटो काढताना दाखवलेली दोन बोटं… फटक्यात करू शकतात बँक खात झिरो

Cyber Crime & V Shape Sign Connection :  कॅमेरा समोर आला की, नकळत आपली दोन बोटे ‘V’ शेपमध्ये म्हणजेच पीस साइन दाखवण्यासाठी वर येतात. हा एक सामान्य ट्रेंड झाला आहे. पण, तंत्रज्ञानाच्या दुनियेतून एक अत्यंत चिंताजनक माहिती समोर आली आहे. तुम्ही सोशल मीडियावर अपलोड केलेले हेच सुंदर फोटो सायबर गुन्हेगारांना आमंत्रण देत आहेत. कारण आता एआयच्या मदतीने तुमचे फिंगरप्रिंट्स थेट तुमच्या फोटोमधून कॉपी केले जाऊ शकतात.

आता व्हॉट्सअपवर नंबरने नाही तर, युझरनेमने होणार चॅटिंग; जाणून घ्या, कसं करायचं User Name सेट?

नेमका काय आहे धोका?

आजचे एआय तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, 5 फुटांच्या अंतरावरून काढलेल्या स्पष्ट फोटोमधून बोटांचे फिंगरप्रिंट पॅटर्न (बायोमॅट्रिक डेटा) कॉपी केले जाऊ शकतात. जरी फोटो थोडा अस्पष्ट असला, तरी हॅकर्स ‘एआय आधारित फोटो एन्हांसमेंट टूल्स’चा वापर करून तो हाय-क्वालिटीमध्ये बदलतात आणि डेटा मिळवण्याचा प्रयत्न करतात.

पासवर्ड बदलता येतो, पण फिंगरप्रिंट नाही!

आपण जर बँकेचा किंवा सोशल मीडियाचा पासवर्ड विसरलो तर तो बदलता येतो. मात्र, आपले फिंगरप्रिंट आयुष्यभर बदलता येत नाहीत. हा बायोमॅट्रिक डेटा चोरीला गेल्यास बँक खाती, डिजिटल पेमेंट सिस्टिम आणि वैयक्तिक ओळखीला धोका निर्माण होऊ शकतो.

कटिंग करताना हजामच्या खुर्चीवर बसताच तुम्हालाही सुटतेय का पेंग?; मग ही बातमी एकदा वाचाच…

घाबरू नका, ‘स्मार्ट’ बना

पीस साइन किंवा v साईन दाखवण्याचा ट्रेंड पूर्णपणे बंद करण्याची अजिबात गरज नाही, पण सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताना काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही स्वतःला पूर्णपणे सुरक्षित ठेवू शकता. त्यासाठी सर्वात आधी फोटो काढताना कॅमेऱ्यापासून योग्य अंतर ठेवा, कारण 5 फुटांपेक्षा जास्त अंतरावरून काढलेल्या फोटोतील फिंगरप्रिंट्स ट्रॅक करणे एआयसाठी कठीण जाते. तसेच, ज्या फोटोंमध्ये हाताचे पंजे किंवा बोटे अगदी जवळून आणि स्पष्ट दिसतात, असे क्लोज-अप फोटोज सोशल मीडियावर शेअर करणे टाळावे.

अकाउंट पल्बिक ऐवजी प्रायव्हेट ठेवा

सुरक्षेचा आणखी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे आपले सोशल मीडिया अकाउंट ‘पब्लिक’ ठेवण्याऐवजी ‘प्रायव्हेट’ ठेवावे, जेणेकरून तुमचे फोटो अनोळखी आणि संशयास्पद लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत. याशिवाय, फोटो अपलोड करण्यापूर्वी एडिटिंग टूल्सचा वापर करून बोटांचा भाग क्रॉप करणे किंवा तो भाग थोडा ब्लर करणे हा देखील एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे. डिजिटल जगात ट्रेंडी राहण्यासोबतच ‘सायबर स्मार्ट’ राहणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे. त्यामुळे पुढच्या वेळी सेल्फी घेताना ही माहिती नक्की लक्षात ठेवा आणि मगच फोटो काढा.

follow us