Pune Police informs MCOCA imposed on accused : पुण्यात नुकतंच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्या कार्यालयातील एका मुलाला मारहाण झाल्याची घटना घडली होती. वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणे शहरात दहशतीचं वातावरण आहे. तर मोहोळ यांच्या कार्यालयातील मुलाला मारहाण झाल्याप्रकरणी पोलीस तपास करत होते. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर आता मकोका लावल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune Police ) यांनी दिलीय,
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील मुलाला मारहाण करणाऱ्या आरोपींवर मकोका लावला, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली आे. सोबतच गजा मारणे टोळीवर देखील मकोका लावलाय. टोळी प्रमुख गजानन मारणेवर देखील (Gaja Marne) कारवाई करणार, असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलंय.
भरधाव कार, CNG चा स्फोट; दोघांचा होरपळून मृत्यू, जामखेडमध्ये भीषण अपघात
गजाजन मारणे टोळी नेस्तानाबूत करण्याची पोलिसांची भूमिका आहे. एकूण 27 आरोपी आमच्या रडारवर आहेत, असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलंय. कोणीही कायदा हातात घेऊ नका, असं आवाहन देखील त्यांनी (Pune Crime) केलंय. त्या टोळीतील सदस्यांची मालमत्तांची माहिती डीडीआर करून त्यांच्या वाहनांची माहिती आरटीओकडून मागवली आहे, असं पोलीस आयुक्त अमितश कुमार यांनी म्हटलंय.
यापुढे काही गुन्हे केले तर पोलीस सोडणार नाही. गुन्हेगारांना कसं नेस्तनाबूत करायचं हे आम्हाला चांगलं माहीत आहे. आम्हाला जनतेची भीती आहे. आमच्यावर कुणाचा दबाव नाही. फक्त जनतेला शांततेचं वातावरण करण्यासाठी दबाव आहे. शहरात कधी कधी काही घटना घडतात, पण आमचा प्रयत्न आणि सुव्यवस्था चांगली आहे. लोकप्रतिनिधीसोबत आमचे चांगले संबंध आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
अतिशय निर्लज्ज बाई …नमकहराम! संजय राऊतांचा पारा चढला, नीलम गोऱ्हेंवर संताप
मोहोळांच्या प्रतिक्रियेनंतर हालचाली केल्या हे चुकीचे
घटना घडल्यावर दुसऱ्या दिवशीच आम्ही कारवाई सुरू केली. मोहोळ यांच्या प्रतिक्रियेनंतर आम्ही हालचाली सुरू केल्या हे चुकीचं आहे. मकोका लावण्यासाठी पोलिसांना काही तयारी करावी लागते, ती आम्ही केली. काही गुन्हेगार पुण्याबाहेर जाऊन गुन्हे करत आहेत. त्यांच्यावर देखील आमच लक्ष आहे, असा इशारा त्यांनी निलेश घायवला दिलाय. आमच्याकडे आक्का ,बाका, काका चालत नाही… गुन्हा केला तर त्यांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील, असं पोलीस आयुक्तांनी सांगितलंय.
पुण्यातील गुन्हेगारी कमी झाली आहे – पोलीस आयुक्त
संख्यात्मक दृष्टिकोनातून बघितले तर, पुण्यातील गुन्हेगारी कमी झाली आहे. पूर्वी प्रत्यके महिन्याला सरासरी 8.5 खून व्हायचे आता महिन्याला सरासरी 7.2 खून होतात असे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. मात्र, जरी गुन्हेगारी कमी झाली असली तरी, आम्ही 6.5 चे उद्दिष्ट ठेवले होते. त्यामुळे कमी झालेल्या गुन्हेगारीवर आम्ही समाधानी नसल्याचे अमितेश कुमार म्हणाले.
खुनाचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यांमध्ये 34 टक्के घट झाली असल्याचे सांगत वाहन तोडफोड किंवा चेन स्नॅचिंगच्या घटना गेल्या काही दिवसांत वाढल्या आहेत. त्या आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. काही गुन्हेगारी टोळ्यांचा विषय आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांना समज देण्यात आली होती. टोळीतील गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात यायचे असेल तर आमचे त्यांच्याशी शत्रुत्व नाही. पण त्यांच्याकडून काही चुकीचे घडले तर त्यांना सोडणार नाही.
लोकांचा विश्वास आमच्यासाठी महत्त्वाचा
कोयता गँग किंवा टोळी अशी कुठली एक टोळी अस्तित्वात नाही. अशा कोणत्या गँग शहरात नाहीयेत. कोयता किंवा हत्यार हातात घेऊन काही गुन्हेगार गुन्हे करतात. त्यांचा बंदोबस्त करण्याचे काम पोलिस करतात. शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित असून, कधीकधी काही घटना घडतात.
आमच्यावर कुणाचा दबाव नसल्याचे सांगत लोकांचा विश्वास आमच्यासाठी महत्वाचा आहे.
राहु सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करणार नाही
अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या विधानानंतर मोठा गदारोळ झाला होता. त्यावर बोलताना अमितेश कुमार म्हणाले की, राहुल सोलापूरकर यांच्यावर सध्यातरी गुन्हा दाखल करणार नसल्याचे ते म्हणाले. तानाजी सावंत सुरुवातीला खूप घाबरलेले होते. आम्ही तत्परता दाखवून चार्टर परत फिरवून मुलाला सुखरूप घरी आणले. त्यांनी खोटी तक्रार दाखल केली तसेच पोलिसांना वेठीस धरले असे म्हणता येणार नाही. पुण्यातील काही गुन्हेगार बाहेरील जिल्ह्यात जाऊन पवन चक्क्यावाल्यांना त्रास, धमक्या दिल्या जातात. त्यांची माहिती गोळा करत आहोत.
असे कोण लोक आहेत ते जनतेला माहिती आहे. तक्रार आली तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे यावेळी अमितेश कुमार यांनी सांगितले.