Download App

वेदांत अग्रवाल प्रौढ, सज्ञान अन् अज्ञान; सुनावणीत काय झालं? वकिलांनी A To Z सांगितलं

पुणे अपघात प्रकरणी आज बाल हक्क न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत काय काय घडलं? याबाबत वेदांत अग्रवालच्या वकीलांनी A To Z माहिती दिलीयं

Image Credit: Letsupp

Pune Porsche Accident : पुण्यातील कल्याणीनगर भागात शनिवारी रात्रीच्या सुमारास बिल्डर विशाल अग्रवाल (Vishal Agrwal) यांचा अल्पवयीन मुलगा वेदांत अग्रवालने (Vedant Agrwal) कारने चिरडत दोघांचा जीव (Pune Accident) घेतला. या प्रकरणी आज बाल हक्क न्यायालयात वेदांतला हजर केले असता, त्याचा जामीन रद्द करुन येत्या 5 जूनपर्यंत त्याची बाल सुधारगृहात रवानगी केलीयं. सुनावणीदरम्यान आरोपी प्रौढ, सज्ञान, अज्ञान यावर युक्तिवाद पार पडला. सुनावणीत नेमकं काय काय घडलं? याबाबत वेदांत अग्रवालचे वकील प्रशांत पाटलांनी A To Z माहिती दिलीयं. सुनावणीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

परभणीत विजयाचा गुलाल माझाच, ही काळ्या दगडावरची रेष…; महादेन जानकरांचा मोठा दावा

प्रशांत पाटील म्हणाले, अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवालला देण्यात आलेला जामीन रद्द करण्यात आला आहे. तसेच त्याला 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आलीयं. पोलिसांचा संपूर्ण तपास पूर्ण होईपर्यंत त्याची रवानगी बाल सुधारगृहात असणार आहे. तसेच सुरक्षेच्या कारणावरुन येत्या 5 जूनपर्यंत वेदांत अग्रवालला निरीक्षणगृहात ठेवण्यात येणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी आरोपी प्रौढ असून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. यासंदर्भातील अर्ज पोलिसांकडून देण्यात आला होता. मात्र, त्यावर युक्तिवाद झालेला नाही. पुढील सुनावणीमध्ये युक्तिवाद होईल. मात्र, एखाद्या अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर 30 दिवसांनंतर पोलिसांना चार्जशीट दाखल करावा लागतो. त्यानंतर आरोपीचे सर्वच रिपोर्टही सादर करावे लागतात. सदरील आरोपी बाहेर असला तरीही चालतं बाल सुधारगृहात असण गरजेचं नसतं. मात्र, अपघातानंतर अल्पवयीन मुलाबाबत लोकांमध्ये रोष असल्याने आरोपीला इजा होऊ नये, यासाठी त्याला बाल सुधारगृहात ठेवण्यात आलं असल्याचं प्रशांत पाटील यांनी सांगितलं आहे.

Video : न्यायालयात पोहोचताच विशाल अग्रवालवर शाईफेक; वंदे मातरम् संघटनेचे कार्यकर्ते ताब्यात

दरम्यान, आरोपी सज्ञान आहे की नाही यावरही सुनावणीदरम्यान, युक्तिवाद झाला असून पुढील दोन ते तीन महिन्यांत पोलिसांच्या तपासानंतर हे ठरवण्यात येणार आहे. त्यानंतर मुलावर सज्ञान म्हणून खटला चालवायचा की नाही हे न्यायालयाकडून ठरवण्यात येणार असल्याचंही पाटील यांनी सांगितलं आहे.

बाल सुधारगृहात चौकशी होणार?
बाल सुधारगृहात चौकशीबाबतची कायद्यात तरदूत नाही. कायद्यानूसार अल्पवयीन मुलाची बाल सुधारगृहात चौकशी न्यायालयाच्या आदेशानूसार करता येऊ शकते. आत्तापर्यंत मी कधी असं पाहिलेलं नाही पण या केसमध्ये होऊ शकत, अशी शक्यताही प्रशांत पाटील यांनी वर्तवलीयं.

follow us

वेब स्टोरीज