परभणीत विजयाचा गुलाल माझाच, ही काळ्या दगडावरची रेष…; महादेन जानकरांचा मोठा दावा

परभणीत विजयाचा गुलाल माझाच, ही काळ्या दगडावरची रेष…; महादेन जानकरांचा मोठा दावा

Mahadev Jankar on Loksabha : राज्यातील पाचही टप्प्यांतील मतदान पार पडलं आहे. परभणी लोकसभा (Parbhani Lok Sabha) मतदारसंघात महायुतीचे महादेव जानकर (Mahadev Jankar) आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) संजय जाधव (Sanjay Jadhav) आमनेसामने होते. या निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. त्याआधीच महादेव जानकरांन मोठा दावा केला. परभणीत विजयाचा गुलाल माझाच असेल, असं वक्तव्य त्यांनी केलं.

Pune Accident : पडकं हॉटेल, 6 जोडी कपडे, अन् अंथरुण; विशाल अग्रवाल नेमकं कुठं लपला होता? 

आज महादेव जानकरांनी एका वृत्त वाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीदरम्यान मी राज्यात 55 सभा घेतल्या. त्यावेळी मला उद्धव ठाकरे आणि शरद पवा यांच्याबद्दल सहानुभूती दिसून आली. मात्र, तरीही महायुतीच्या 42 जागा निवडून येणार आहेत. बारामतीत सुनेत्रा पवार, बीडमध्ये पंकजा मुंडे आणि परभणीत मी निवडून येणार, ही काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे, असा दावा त्यांनी केला.

Pune Accident : बिल्डर विशाल अगरवालला कशी झाली अटक? ‘हे’ पाच मुद्दे ठरले अडचणीचे 

पुढं बोलतांना जानकर म्हणाले की, परभणीच्या जनतेने कोणाला आशीर्वाद दिला हे 4 जूनला कळेल. मात्र, मी परभणीच्या जनतेचे आभार मानतो. कारण त्यांनी मला लवकर स्वीकारलं. विकासाच्या मुद्द्यांवर येथील जनतेने माझ्यावर प्रेम केलं. यामध्ये सर्व समाजातील लोकांनी मला मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ४ जूनला विजयाचा गुलाल माझाच असेल, असा विश्वास जानकरांनी व्यक्त केला.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा काही प्रमाणात आपल्याला फटका बसल्याचंही जानकर यावेळी म्हणाले. महाविकास आघाडीने खतपाणी घालून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद उभा केलां. बीड आणि परभणीत सगळ्यात जास्त कोण फिरलं हे देखील पाहिलं पाहिजे. एका जातीवर राजकारण करणे चुकीचे असल्याचेही जानकर म्हणाले.

दरम्यान, बारामतीतून सुनेत्रा पवार, बीडमधून पंकजा मुंडे आणि परभणीतून मी निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, हा जानकरांचा दावा कितपत खरा ठरतो? हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज