Pune Accident : बिल्डर विशाल अग्रवाल कशी झाली अटक? ‘हे’ पाच मुद्दे ठरले अडचणीचे

Pune Accident : बिल्डर विशाल अग्रवाल कशी झाली अटक? ‘हे’ पाच मुद्दे ठरले अडचणीचे

Vishal Agarwal Arrested In Pune Accident : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात नुकताच भीषण अपघात झाला. पोर्शे कारने एका अल्पवयीन तरुणाने येथी दोघांना उडवलं. त्यामध्ये दुर्दैवाने दोघांचाही मृत्यू झाला. त्यानंतर राज्यासह देशभरात हा विषय चर्चेत आहे. यातील आरोपीला अटक होताच जामीन मंजूर केल्याने हा विषय चांगलाच तापला आहे. दरम्यान, हा तरूण येथील उद्योगपती विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे. आता या प्रकरणात विशाल अगरवाल यांना छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली.

 

मोठी बातमी : विशाल अग्रवालसह तिघांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी; सत्र न्यायालयाचा निर्णय

मोबाईलमध्ये दुसरं सिमही टाकलं

गुन्हा दाखल झाल्याचं समजताच विशाल अगरवाल अग्रवाल यांनी फरार होण्याची योजना आखली होती. त्यांनी आपली कार घरी सोडली आणि दुसरी गाडी ही मुंबईला सोडण्यास सांगितली. यानंतर त्यांनी त्यांच्याच दुसऱ्या ड्रायव्हरला तिसरी गाडी ही गोव्याला नेण्यास सांगितलं. दरम्यान या गाडीतून मुंबईला जाताना ते गाडीतून मध्येच उतरले आणि त्यानंतर मित्राच्या गाडीत बसून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघाले. त्यांनी अनेक सीमकार्ड देखील घेतले आणि त्यावरून संपर्क साधत होते. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी विशाल अगरवालअग्रवाल यांनी अनेक गाड्यांचा वापर केला. तर, पोलिसांना त्यांचा माग न काढता यावा म्हणून त्यांनी मोबाईलमध्ये दुसरं सिमही टाकलं होतं.

 

वाल्याची नाही, डॉक्टरची चौकशी होणं गरजेचं; पुणे अपघातप्रकरणी सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

पथकाने रात्री छापा टाकला

पुणे पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच जीपीएसद्वारे त्यांनी विशाल अग्रवाल यांचा माग काढण्यास सुरुवात केली. यानंतर पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने रस्त्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासून विशाल अगरवालची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. यात त्यांची ओळख पटल्यावर विशाल अगरवाल हे संभाजीनगर येथे पोहोचले असल्याचं उघड झालं. त्यानंतर विशाल अग्रवाल ज्या ठिकाणी लपले होते त्या ठिकाणी पुणे पोलिसांच्या पथकाने रात्री छापा टाकून त्यांना ताब्यात घेत अटक केली.

 

अडचण वाढवणारे मुद्दे

  • विशाल अग्रवालने मुलाला विना नंबर प्लेट गाडी का चालवायला दिली ?
  • वडिलांनी मुलाला पबमध्ये जाण्याची का संमती दिली?
  • गुन्हा दाखल झाल्यानंतर विशाल अगरवाल का फरार झाले ?
  • विशाल अग्रवालकडे एक साधा मोबाईल मिळाला.
  • विशाल अग्रवाल यांच्याकडील दुसरे मोबाईल कुठं ठेवले

follow us
  • fb
  • instagram
  • youtube