Download App

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवसापासून सुरु होणार रिंगरोडचे काम

  • Written By: Last Updated:

Pune RingRoad :  पुण्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या रिंगरोडचे काम दिवाळीपासून सुरु होणार असल्याचे संकते मिळाले आहेत. याचे कारण या रिंगरोडसाठी तब्बल 15 हजार 875 कोटींची पात्रता निविदा प्रसिद्ध झाली आहे. स्थानिक नागरिकांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात किमान 5 ते 6 टक्के वाढ करण्यात आली आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वर्तुळाकर रस्ता प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठीची भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मावळ, मुळशी, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या तालुक्यातून हा वर्तुळाकार रस्ता प्रस्तावित आहे.

अंतिम निर्णय बाकी, पण माझ्याकडून… शरद पवारांच्या राजीनाम्यावर ठाकरे बोलले

या रस्त्याला राज्य सरकारने मान्यता दिली असून, त्याला राज्य महामार्गाचा दर्जाही मिळाला आहे. या रस्त्यांची लांबी 172 किमी असून रुंदी 110 मीटर आहे. या प्रकल्पासाठी 2300 हेक्टर जागेची आवशक्यता आहे.

हा वर्तुळाकार रस्ता 2007 पासून विकास आराखड्यामध्ये प्रस्तावित आहेत. 2011 मध्ये शासनाने या रस्त्याला मान्यता दिली आहे. यानंतर अनेक अडचणी आल्याने प्रादेशिक विकास आराखड्यातील प्रस्तावित मार्गाऐवजी नव्याने आखणी करण्यात आली आहे. पुरंदर विमानतळासाठी उपयुक्त ठरेल, अशी रचना करण्यात आली आहे.

तब्बल बारा वर्षांनंतर पाकिस्ताचे पराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर

हा रस्ता सुमारे 172 किलोमीटर लांबीचा असून 110 मीटर रुंद आहे. मावळ, हवेली, पुरंदर, खेड आणि भोर या तालुक्यातून जाणार आहे. हा मार्ग पुणे-सातारा मार्गावरील वरवे बुद्रुक येथून सुरु होऊन पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से येथे पोहोचेल.

Tags

follow us