Download App

Pune : समोर आप्पा बारणे असो की पार्थ पवार, चितपट करणारच! उमेदवारीवर शिक्कामोर्तब होताच वाघेरेंची डरकाळी

  • Written By: Last Updated:

Pune : लोकसभेसाठी सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. यामध्ये पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड हा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र या बालेकिल्ल्यातच अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. कारण अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेले मा.महापौर,मा.शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) संजोग वाघेरे यांनी ठाकरे जाण्याचा निर्धार पक्का केला आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादीचे श्रीरंग बारणे असो वा पार्थ पवार यापैकी कोणालाही चितपट करण्यासाठी शड्डू ठोकला आहे.

Ranbir kapoor : रणबीर कपूरला ख्रिसमस पार्टी भोवली; ‘त्या’ कृत्यामुळे पोलिसांत तक्रार

नुकताच लेट्सअप मराठीने वाघेरे यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, मी ज्या पक्षात राहिलो. त्या ठिकाणी मी एकनिष्ठ राहिलो आहे. उद्धव ठाकरेंचे विचार आणि त्यांचं काम पाहिलं. त्यामुळे मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे त्यांनी माझ्यावरती लोकसभा निवडणुकीची जबाबदारी दिल्यास मी कोणताही उमेदवार समोर असल्यास माझं काम करणारच. असं म्हणत एक प्रकारे समोर असणाऱ्या अजित पवार गटाविरुद्ध लढण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान येत्या 30 डिसेंबरला म्हणजे शनिवारी संजोग वाघेरे यांचा शिवसेनेच्या ठाकरे गटांमध्ये प्रवेश होणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना मातोश्रीवर येण्याचं आवाहन देखील वाघेरे यांनी केल्याच पाहायला मिळत आहे.

Rajkumar Rao: राजकुमार रावचा पान टिपू येणार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

संजोग वाघेरे यांनी दोन वेळा लोकसभा निवडणुकीची तयारी करून देखील राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्याने ठाकरे यांची भेट घेत उमेदवारीची मागणी केली होती. त्यावर ठाकरेंनी दोन दिवसांचा वेळ मागितला होता. त्यानंतर आता ते थेट ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. वाघेरे हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि पिंपरी चिंचवड मधील राष्ट्रवादीचे मोठे नेते मानले जातात. तसेच ते मा.महापौर,मा.शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) देखील होते. तर त्यांचे वडील देखील राष्ट्रवादीत होते. त्यांनी शरद पवारांना खंबीर साथ दिली. पवार घराण्यावर त्यांचं विशेष प्रेम आहे.

मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर संजोग वाघेरे यांनी सुरुवातीला शरद पवार यांच्या गटाला पाठिंबा दिला. मात्र त्यानंतर ते पुन्हा एकदा अजित पवार यांच्यासोबत गेले. दरम्यान वाघेरे यांना राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युला मध्ये वाघेरे यांना मावळमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर दिसू लागताच त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तर आता येत्या 30 डिसेंबरला म्हणजे शनिवारी संजोग वाघेरे यांचा शिवसेनेच्या ठाकरे गटांमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणात एकच खळबळ उडालीय.

follow us