पुणे : पिंपरी-चिंचवडच्या सहायक पोलीस आयुक्तांनवर साडेबारा लाख रुपये खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट हे सध्या पिंपरी-चिंचवड शहरात कार्यरत असून त्यांच्याबरोबर एका पोलीस कर्मचाऱ्यावर खंडणी घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा येथील राजेंद्र चोरगे यांनी तक्रार दिली होती. सहायक आयुक्त पद्माकर घनवट हे यापूर्वी सातारा स्थानिक गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक या पदावर होते. चोरगे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, सातारा शहरात आमची शैक्षणिक संस्था असून १४ वर्षांपासून या संस्थेचे अध्यक्ष म्हणून ते कारभार पाहत आहेत. विनाकारण संस्थेत येऊन आम्हाला त्रास देत होते. संस्थेच्या विरोधात कोणतीही तक्रार नसताना तत्कालीन सातारा ‘एलसीबी’चे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट आणि शिर्के संस्थेत येऊन नाहक त्रास देत होते.
Sanjay Shirsath : मी काय अश्लील बोललो सिद्ध करा… लगेच राजीनामा देतो! – Letsupp
मूळचे बांधकाम व्यावसायिक असलेल्या राजेंद्र चोरगे यांनी सहायक आयुक्त पद्माकर घनवट आणि पोलीस हवालदार विजय शिर्के यांच्याविरोधात साडेबारा लाख रुपये घेतल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार घनवट आणि शिर्के यांच्याविरोधा सातारा शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाची दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घनवट आणि शिर्के यांची चारवेळा प्राथमिक व विभागीय चौकशी केली. या चौकशी अहवालात दोघेही दोषी असल्याचे आढळल्याने दोघांच्याही विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
(234) Sushma Andhare : सुषमा अंधारे यांची स्फोटक मुलाखत | LetsUpp Marathi – YouTube