Sanjay Shirsath : मी काय अश्लील बोललो सिद्ध करा… लगेच राजीनामा देतो!

  • Written By: Published:
Sanjay Shirsath

छत्रपती संभाजीनगर : आता जो व्हिडिओ सर्व चॅनेल आणि सोशल मीडियावर माझा फिरतोय. त्यात मी काय अश्लील बोललो असेल तर आमदारकीचा तातडीने राजीनामा देईन. काय अश्लील बोललो आहे, हे तर मला दाखवा, असे चॅलेंज सुषमा अंधारे यांना संजय शिरसाठ यांनी दिले आहे.

संजय शिरसाठ म्हणाले की, गेल्या आठवड्यात माझाकडे शिवसेनेचा एक मेळावा आयोजित केला होता. आता जे सगळ्या चॅनेलवरून दाखवले जात माझं ते वक्तव्य होते. मात्र, या ज्या सुषमा अंधारे आहेत त्या चावी दिल्यासारख्या बोलत आहे. माझा भाऊ, माझा भाऊ बोलत आमच्यावर जी टीका करत आहेत त्या आम्ही माफ करायच्या का ? असा सवाल देखील उपस्थित केला.

Sanjay Shirsath यांचा अंधारेंना धमकीवजा इशारा… ‘परळीतील धिंड बद्दल बोलू का…? – Letsupp

सुभेदार गेस्ट हाऊसमध्ये त्या सभेसाठी आल्या होत्या. ज्या ठिकाणी इंदिरा गांधी, शरद पवार, व्ही. पी. सिंग राहिलेल्या आहेत. त्या देखील राहिल्या आहेत. आमच्या नेत्यांच्या मतदारसंघात जाऊन त्या शिव्या देत आहेत. महिला म्हणून ते आरोप करतात. आम्ही ते गपगुमान सहन करायचे का, असा सवाल संजय शिरसाठ यांनी उपस्थित केला आहे.

संजय शिरसाठ म्हणाले की, या पूर्वी सुषमा अंधारे या हिंदु देवी-देवता, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबाबत त्या काय काय बोलल्या आहेत. हे पण तपासून घ्या.

(234) Sushma Andhare : सुषमा अंधारे यांची स्फोटक मुलाखत | LetsUpp Marathi – YouTube

Tags

follow us