Download App

Pune News : हुश्श्य! पुणेकरांचा जीव भांड्यात पडला; कालवा समितीच्या बैठकीत पाणीकपात टळली

  • Written By: Last Updated:

Pune Water Supply News :  पुणेकरांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. आज पार पडलेल्या कालवा समितीच्या बैठकीमध्ये पाणी कपातीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत पाणी कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ग्रामीण भागाला शेतीसाठी आवर्तन सोडलं जाणार आहे. याशिवाय पाणी कपातीबाबतचा पुढील निर्णय १५ मे नंतर पुन्हा आढावा घेऊन घेतला जाणार आहे.

राहुल गांधी भगवा हातात घ्या, मग आम्ही काँग्रेसचेच; गुलाबरावांच्या वक्तव्याने खळबळ !

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांमध्ये जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. त्यामुळे पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट ओढावणार अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली होती. याबाबत आज कालवा समितीची बैठक पार पडली. यात शहराच्या पाणी कपातीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाणार होता. त्यामुळे या बैठीकीकडे सर्व पुणेकरांचे लक्ष लागून राहिले होते. त्यानंतर आता शहरात पाणी कपात होणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लाखो पुणेकरांचा जीव भांड्यात पडला आहे.

एक तरी आमदार निवडून आणा; केसीआरच्या अब की बार… घोषणेवर शरद पवारांचा खोचक टोला

धरणांमध्ये किती पाणीसाठा? 

पुणे शहराला खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत याच चार धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. या चारही धरणां मिळून सध्या साडे अकरा टीएमसी एवढा पाणीसाठी शिल्लक असून, दर महिन्याला  पुणे शहराला सव्वा टीएमसी पाणी लागतं. त्यात यावर्षी एप्रिल महिन्यातच पाणीसाठा कमी झाल्याने शहरावर पाणी कपात ओढवली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.

सुनील बर्वेच्या अमर फोटो स्टुडिओ नाटकानं घेतला अखेरचा निरोप

कोणत्या धरणात किती पाणीसाठा?

खडकवासला – 1.07 टीएमसी
पानशेत – 3.41 टीएमसी
वरसगाव – 6.75 टीएमसी
टेमघर – 0.28 टीएमसी

Yash Dayal : रिंकू सिंहच्या 5 धडाकेबाज सिक्सने बॉलरची तब्येत खराब; वजन झाले 8 किलो कमी

पुन्हा घेतला जाणारा आढावा 

दरम्यान, आजच्या कालवा समितीच्या बैठकीत जरी पाणी कपातीचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसला तरी, अद्यापही पुणेकरांवरची पाणी कपातीची तलवार कायम आहे. सध्या जरी पाणी कपात केली जाणार नसली तरी, याबाबतचा पुढील आढावा 15 मे नंतर पुन्हा घेतला जाणार आहे. तोपर्यंत पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags

follow us