पुणेकरांसाठी मोठी बातमी : दर गुरुवारी होणारी पाणीकपात रद्द

पुणे शहरात होणारी पाणी कपात रद्द होणार आहे. पुणे शहरात दर गुरुवारी होत असलेली पाणी कपात रद्द होणार आहे. याबाबत पुण्याचे माजी महापौर व भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. या निर्णयामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची घोषणा केली आहे. पुणे शहरातील पाणीकपात रद्द ! […]

Letsupp Image   2023 07 29T144652.920

Letsupp Image 2023 07 29T144652.920

पुणे शहरात होणारी पाणी कपात रद्द होणार आहे. पुणे शहरात दर गुरुवारी होत असलेली पाणी कपात रद्द होणार आहे. याबाबत पुण्याचे माजी महापौर व भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. या निर्णयामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटमध्ये काय म्हटले आहे?

पुणे शहरातील पाणीकपात रद्द ! पुणे शहरात दर गुरुवारी सुरु असलेली पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुणेकरांना आता दैनंदिन आणि नियमित पाणीपुरवठा होणार आहे. समस्त पुणेकरांनी याची नोंद घ्यावी ! पुणेकरांच्या वतीनं पालकमंत्री मा.श्री चंद्रकांतदादा पाटील यांचे मनःपूर्वक धन्यवाद !

‘जायचं तर जा पण, पक्षाशी गद्दारी करू नका अन्यथा’.. उद्धव ठाकरेंचा फुटीरांना रोखठोक इशारा

यामुळे पुणेकरांना उद्यापासून पूर्णवेळ पाणी मिळणार आहे. पुण्याच्या पाणीप्रश्नाबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सिंचन विभाग आणि महापालिका अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पावसाच्या जोरदार सरी बरसत असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात मोठा पाणीसाठा जमा झाला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणातील एकत्रित पाणीसाठा वाढला आहे.

भिडे या भयानक विकृत वृत्तीच्या माणसाला तात्काळ अटक करावी; कवी सौमित्र यांची मागणी

पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने धरणसाठ्यात वाढ झाली आहे. खडकवासला धरण भरल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता या प्रकल्पात एकूण २१.१८ टीएमसी (७२.६५ टक्के) इतका पाणीसाठा जमा झाला होता.

 

Exit mobile version