भिडे या भयानक विकृत वृत्तीच्या माणसाला तात्काळ अटक करावी; कवी सौमित्र यांची मागणी

भिडे या भयानक विकृत वृत्तीच्या माणसाला तात्काळ अटक करावी; कवी सौमित्र यांची मागणी

Kishor Kadam On Sambhaji Bhide :  ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून वाद निर्माण केला. अनेकदा अतार्किक आणि वादग्रस्त विधाने करणाऱ्या भिडे यांच्याविरोधात राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सामाजिक संघटनांनी भिडेंचा निषेध केला आहे. अशातच आता कलावंतही पुढे येत असून भिडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत आहेत. कवी सौमित्र उर्फ ​​किशोर कदम (Kishor Kadam) यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत मनोहर भिडे या भयानक विकृत वृत्तीच्या माणसाला अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. (Kishor Kadam On Sambhaji Bhide they said arrest manohar bhide immediately)

किशोर कदम यांनी संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी करतानाच सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही परखड भाष्य केलं आहे. कदम यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘अजित पवारांना उपमुख्यमंत्री करत भिडे वृत्तीच्या माणसांना बोलतं करून अजित पवारांना हतबल करत राहणं हा राजकारणाचा भाग आहे. आपण सगळेच या राजकारणामुळे कोंडींत सापडलो आहोत. आता हा मुद्दा शिंदेजी आणि अजितजी कसे हाताळतात हा नसून माननीय फडणवीसजी या दोघांची मजा बघत बसणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. तसं नसेल तर तात्काळ संभाजी नव्हे, मनोहर भिडे या भयानक विकृत वृत्तीच्या माणसाला अटक करावी, अशी एक कलावंत म्हणून मागणी करत आहे, अशा शब्दात त्यांनी भिडे यांच्यचावर टीकास्त्र डागलं आहे.

शेतकरी संघटनेचे राहुरीत चक्काजाम आंदोलन; दुग्धाभिषेक करत सरकारचा निषेध 

सौमित्र यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून अनेकांनी त्यांची मताशी सहमती दर्शवली आहे.

भिडे नेमकं काय म्हणाले?
एका कार्यक्रमात बोलतांना संभाजी भिडेंनी राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान केलं होतं. महात्मा गांधींचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असल्याचे सांगितले जातं, मात्र करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून मुस्लिम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असे धक्कादायक विधान करत नव्या वादाला तोंड फोडलं. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, काल विधानसभेत संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी केल्यानंतर आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ही मागणी होत आहे, अशा स्थितीत सरकार याबाबत काही कठोर निर्णय घेणार का, हे पाहावे लागेल.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube