Download App

Pune : ‘नियोजनातून काम कर’, विजयानंतर बापटांचा धंगेकरांना सल्ला

पुणे :  कसबा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा 11 हजार 40 मतांनी पराभव केला आहे. यानंतर धंगेकर बापट यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते.

कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला होता. याठिकाणी गिरीश महाजन जवळपास 20 वर्षांपेक्षा अधिक काळापासून विधानसभेवर निवडून येत होते. 2019 साली ते खासदार म्हणून निवडून गेल्यावर त्याठिकाणी भाजपच्या मुक्ता टिळक या आमदार झाला होत्या. मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने ही पोटनिवडणूक लागली होती.

Maharashtra Budget : विरोधकांनी केला सभात्याग; बालविकासमंत्र्यांच्या उत्तराने वाढला वाद

बापट यांच्या भेटीनंतर रवींद्र धंगेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. बापट साहेबांनी मला आशिर्वाद दिले आहेत व पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नियोजन कर व नियोजनाप्रमाणे काम कर असा सल्ला त्यांनी मला दिल्याचे धंगेकर यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत पुण्याचे राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे देखील उपस्थित होते.

दरम्यान  सध्या गिरीश बापट यांची तब्येत बरी नाही. ते आजारी आहेत. तरी देखील त्यांनी कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. एवढेच नाही तर ते मतदानाच्या दिवशी प्रचाराला देखील आले होते. यावरुन विरोधकांनी भाजप नेतृत्वार जोरदार टीका केली होती. तसेच गिरीश बापट यांनी या निवडणुकीत आपल्या सुनेसाठी देखील उमेदवारी मागितल्याची चर्चा आहे.

 

Tags

follow us