Maharashtra Budget : विरोधकांनी केला सभात्याग; बालविकासमंत्र्यांच्या उत्तराने वाढला वाद

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 03T115301.444

Maharashtra Budget : अंगणवाडी सेविका आणि मानधनाच्या मुद्द्यावर महिला बालविकास मंत्री समाधानकारक उत्तरे देत नसल्याने विरोधकांनी सरकारच्या कारभाराचा निषेध करत सभात्याग केला.

अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये मानधन आणि अंगणवाडी मदतनीसांना दहा हजार रुपये मानधन देणार का, असा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विचारला होता. विधीमंडळ सभागृहातील शंभर आमदार अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मानधन वाढवून देण्याबाबत प्रश्न विचारत आहेत इतका गंभीर प्रश्न असताना संबंधित बालविकासमंत्री म्हणतात की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगतील मग तुमच्या उत्तराला काय अधिकार, असा सवाल पवार यांनी केला.

वाचा : Kasba By Election : चिंचवडही जिंकलं असतं पण, राहुल कलाटेंवर अजित पवार म्हणाले

अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधन वाढीचा प्रश्न सभागृहात आमदार पोटतिडकीने विचारत असताना बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा समाधानकारक उत्तर देत नसल्याने विरोधी आमदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

हे तर शेतकरी विरोधी सरकार, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नाना पटोलेंचा घणाघात

राज्यातील अंगणवाडी सेविकांना १५ हजार रुपये मानधन आणि मदतनीसांना १० हजार रुपये मानधन देणार का? असा सवालही अजित पवार यांनी मंत्र्यांना केला. या प्रश्नावर योग्य ते व समाधानकारक उत्तर बालविकास मंत्री लोढा यांनी न दिल्याने विरोधकांनी सभात्याग केला.

Tags

follow us