पुण्यातील धक्कादायक ‘लाच’ प्रकरण; तब्बल आठ कोटींची मागणी, पोलिसांनी रंगेहात पकडलं

या प्रकारानंतर दोन आरोपींनी तक्रारदारांशी संपर्क साधून 8 कोटी रुपये दिले तरच जमीन नोंदणी व इतर कागदपत्रे मिळतील असं सांगितलं.

News Photo   2025 12 06T211700.908

पुण्यातील धक्कादायक 'लाच' प्रकरण; तब्बल आठ कोटींची मागणी, पोलिसांनी रंगेहात पकडलं

पुण्यातून भ्रष्टाचाराबाबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Pune) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कोट्यवधींची लाच मागताना 2 जणांना रंगेहात पकडलं आहे. 5 डिसेंबर रोजी सापळा लावून विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विभागाने पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत 8 कोटींची लाच मागणाऱ्या दोन व्यक्तींना रंगहात पकडलं आहे. त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद देशमुख आणि भास्कर पौळ अशी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावं आहेत.

Video : महायुतीच बघू, पुण्यात आमची तयारी पूर्ण, धंगेकर पुन्हा भाजप विरोधात मैदानात

तक्रारदार व्यक्तीची 32 गुंठे सोसायटी जमीन पुण्यात कॅन्टोन्मेंट क्षेत्रात आहे. 2005 नंतर या जमिनीचा नवा 7/12 उतारा, नवीन नकाशा यासाठी तक्रारदार वारंवार सरकारी कार्यालयात पाठपुरावा करत होते. 2020 पासून तक्रारदारांचं काम काही केल्या होत नव्हतं. सरकारी अभिलेख विभागातील काही अधिकारी व मध्यस्थांमार्फत लाच देणे गरजेचं आहे अशी मागणी सुरू असल्याची तक्रारदारांना कल्पना दिली गेली.

या प्रकारानंतर दोन आरोपींनी तक्रारदारांशी संपर्क साधून 8 कोटी रुपये दिले तरच जमीन नोंदणी व इतर कागदपत्रे मिळतील असं सांगितलं. आरोपींनी तक्रारदारांच्या घरच्या सदस्यांकडंही संपर्क केला, त्यांना मानसिक त्रास दिला आणि पैशांची मागणी केली. यामुळे कंटाळून तक्रारदारांनी 5 डिसेंबर 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. यानंतर पोलीसांनी सापळा लावून आरोपींना रंगेहाथ पकडलं.

लाच मागणाऱ्या आरोपींमध्ये विनोद देशमुख (शासकीय भूमी अभिलेख खात्यातील सरकारी कामकाजाशी संबंधित व्यक्ती, कार्यालय पुणे, न्यू भामा सोसायटी, वाढगाव बुद्रुक) आणि भास्कर पौळ (स्वतःला ‘सरकारी भूसंपादन सल्लागार व ऑडीटर’ म्हणवणारा. पत्ता रामपूर रोड, मंगुठा मंदिराजवळ, रहिमाबाद, नवी मुंबई या दोघांचा समावेश आहे. या दोघांनी पहिल्या हप्त्यात 30 लाखांची मागणी केली होती. हेच 30 लाख रुपये घेताना या आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.

Exit mobile version