Download App

गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी पुनीत बालन यांची मोठी घोषणा; उद्योग व्यवसायासाठी करणार मदत

पुनीत बालन ग्रुपतर्फे गणेश मंडळांच्या (Pune News) कार्यकर्त्यांना व्यावसायासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Pune News : गणेश मंडळांचे आधारस्तंभ असलेले युवा उद्योजक पुनीत बालन (Punit Balan) यांनी गणेश मंडळ कार्यकर्त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पुनीत बालन ग्रुपतर्फे गणेश मंडळांच्या (Pune News) कार्यकर्त्यांना व्यावसायासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी ३ कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी केली. पुण्यातील सार्वजनिक गणपती मंडळाचे कार्यकर्ते आणि ढोल ताशा पथकातील वादक यांच्यावतीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टचे उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पुनीत बालन यांनी ही घोषणा केली.

सारसबाग येथील श्री सिद्धिविनायक गणपतीची आरती बालन यांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब थोरात आणि निंबाळकर तालीम मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते सुरेश पवार यांनी पुनीत बालन यांना मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

ऐतिहासिक स्मारकांची स्वच्छता करणार; उद्योजक पुनीत बालन यांचा पुढाकार, पुरातत्व विभागाशी करार

पुनीत बालन म्हणाले, गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा असतो. ज्याला काही कामधंदा नाही तो गणपती मंडळाचे काम करतो अशी सर्वसाधारण लोकांची धारणा असते. कार्यकर्ता महिना दीड महिना आपल्या रोजगाराचा विचार न करता गणरायाची सेवा करत असतो. गणेश मंडळांचा कणा म्हणजे कार्यकर्ता तो टिकला पाहिजे, तो जगला पाहिजे त्याला समाजामध्ये सन्मान मिळाला पाहिजे आणि त्याच्याकडे आदराने पाहिलं पाहिजे.

या सर्व गोष्टींचा विचार करून कार्यकर्त्यांना व्यवसायात मदत करून त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्याचा निर्णय बालन ग्रुपने घेतला आहे. ग्रुपतर्फे तीन कोटी रुपये आर्थिक मदत केली जाईल अशी घोषणा पुनीत बालन यांनी यावेळी केली. या निधीतून दरवर्षी 100 ते 300 कार्यकर्त्यांना मदत करण्यात येईल. प्रत्येक वर्षी मदती निधीमध्ये वाढ होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

या निर्णयाचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून जोरदार स्वागत केले. यावेळी रवींद्र माळवदकर, पराग ठाकूर, उदय जगताप, सूर्यकांत पाठक, धीरज घाटे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. श्री देवदेवेश्वर सारसबाग संस्थेचे विश्वस्त रमेश भागवत, प्रसाद कुलकर्णी, विकास पवार, हेमंत रासने, दत्ता सागरे, अनिल सकपाळ, संजीव जावळे शिरीष मोहिते, सुरेश जैन, पियुष शहा, आशुतोष देशपांडे आदींसह गणेशोत्सव मंडळ, जय गणेश व्यासपीठ आणि ढोल ताशा पथकातील वादक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Puneet Balan: पैलवान विजय डोईफोडेच्या उपचारांसाठी ‘पुनीत बालन ग्रुप’ सरसावला; ५ लाखांची केली मदत

follow us