सारसबागेत गर्दी जमवून गणपतीची आरती, तरुणावर थेट गुन्हा; पुण्यातील प्रकार

सारसबागेत गर्दी जमवून गणपतीची आरती, तरुणावर थेट गुन्हा; पुण्यातील प्रकार

Pune News : पुणे शहरातील सारसबाग येथील (Pune News) गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. आता येथूनच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गणपती बाप्पासमोर गर्दी जमवून आरती केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संग्राम उर्फ अक्षय ढोले पाटील असे या तरुणाचे नाव आहे. सारसबाग येथे दर शुक्रवारी आरती करण्याचे नियोजन केले होते. यासाठी काही हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यानंतर पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या तरुणाला दहा निर्देशांचे पालन करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

या प्रकाराची पुण्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध केला आहे. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनीही या कारवाईचा निषेध केला आहे. पुण्यातील सारसबाग येथील हा गणपती राज्यात प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा गणपती अशी या गणपतीची ख्याती आहे. त्यामुळे गणपतीच्या दर्शनासाठी कायमच गर्दी असते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक या गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. अशी परिस्थिती असताना गर्दी जमवून आरती केल्याप्रकरणी तरुणावर थेट गुन्हा दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Pune News : होय, मी लढणार अन् जिंकणार! भिमालेंनी दंड थोपटल्याने माधुरी मिसाळांना टेन्शन 

या प्रकरणी या तरुणाला काही आवश्यक निर्देशांचे पालन करण्याच्या सूचना स्वारगेट पोलिसांनी दिल्या आहेत. यामध्ये भविष्यात कोणताही गुन्हा करणार नाही. या खटल्यातील पुराव्यांशी कोणतीही छेडछाड करणार नाही. केसची वस्तुस्थिती माहिती असलेल्या कोणत्याही व्यक्तीला कोणतीही धमकी, प्रलोभन किंवा वचन देणार नाही. आवश्यकतेनुसार आणि निर्देशानुसार न्यायालयासमोर हजर राहावे लागणार.

आवश्यकतेनुसार तपासात सामील व्हावे लागणार तसेच सहकार्य करावे. प्रकरणाच्या योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी तपासाच्या उद्देशाने संबंधित कोणताही भाग न लपवता सर्व तथ्य उघडे कराल. आवश्यक असलेली सर्व संबंधित कागदपत्रे आणि साहित्य तयार कराल. साथीदार खटल्याच्या तपास चाचणीच्या उद्देशाने संबंधित कोणताही पुरावा कोणत्याही प्रकारे नष्ट करू देणार नाही असे निर्देश स्वारगेट पोलिसांनी दिले आहेत.

‘हिट अँड रन’मुळे पुणे पुन्हा हादरलं; अज्ञात वाहनाने दोन पोलिसांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू

follow us
  • fb
  • instagram
  • youtube