‘हिट अँड रन’मुळे पुणे पुन्हा हादरलं; अज्ञात वाहनाने दोन पोलिसांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू

‘हिट अँड रन’मुळे पुणे पुन्हा हादरलं; अज्ञात वाहनाने दोन पोलिसांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू

Pune Accident News : पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बोपोडी परिसरात अज्ञात वाहनाने दोन पोलिसांना उडवलं. या घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. (Pune Accident ) तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. (Accident) कल्याणीनगर परिसरातील पोर्श कार अपघाताची घटना ताजी असताना शहरात पुन्हा एकदा अशी घटना घडली आहे.

मुंबईत पावसाचा जोर वाढला; अनेक ठिकाणी साचले पाणी, लोकलसेवा विस्कळीत

समाधान कोळी असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. तर, पी.सी शिंदे असं गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक पळून गेला असून, सध्या पुणे पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समाधान कोळी आणि पी.सी शिंदे हे बीट मार्शल म्हणून मध्यरात्री गस्तीवर होते. हॅरिस ब्रीज बोपोडीजवळ दोघेही दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.

अपघात इतका भीषण होता, की यात समाधान कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. तर शिंदे हे गंभीर जखमी झाले. दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले.

पुणे हादरलं! ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची कारवाई केल्याने महिला पोलिसाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

गंभीर जखमी असलेल्या शिंदे यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर, समाधान कोळी यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube