Samriddhi Accident : समृद्धी महामार्गावरील ‘तो’ भीषण अपघात, वडेट्टीवार विधानसभेत आक्रमक
Vijay Vadettiwar : समृद्धी महामार्गावर १ जुलै, २०२३ रोजी मोठी अपघाताची घटना घडली होती. (Assembly session ) त्यावेळी मृतांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपये देण्याची घोषणा शासनाने केली होती. परंतु, प्रत्यक्षात मात्र फक्त सात लाख रुपये देण्यात आले आहेत. (Samriddhi Accident) त्यामध्ये राज्यसरकारकडून ५ लाख रुपये आणि केंद्र सरकार २ लाख रुपये अशी मदत मिळाली आहे. दरम्यान, या मुद्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी विधानसभेत आक्रमक होत या घटनेतील कुटुंबाना तातडीने मदत करावी अशी मागणी केली. तसंच, सरकारने यांची फसवणूक केली असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
Video : तू कधी मरशील..? भाजप शहराध्यक्ष घाटेंबद्दल काँग्रेसच्या शिंदेंचे वादग्रस्त विधान
वडेट्टीवार म्हणाले, समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ रात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ज्यामध्ये लक्झरी बस जळून २५ प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेला जवळपास आता एक वर्ष पूर्ण होतय. मात्र, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपये देण्याची शासनाची घोषणा आमलात आली नाही. सीएम फंडातून केवळ ५ लाख रूपये आणि केंद्र सरकार कडून २ लाख रूपये मदत देऊन बोळवण करण्यात आली आहे असा घणाघातही वडेट्टीवार यांनी यावेळी केला.
पुण्यातील पोर्शे कार घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाखांची मदत सरकारकडून तात्काळ करण्यात आली असताना ३६५ दिवस होऊनही समृद्धी महार्गावरील लक्झरी बस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात टाळाटाळ होत आहे. अनेकवेळा मागणी करूनही मदत न दिल्याने सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर मडावी यांनी २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गळफास घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल अशी माहितीही वडेट्टीवारांनी दिली आहे.
Pune Water: पाणी कुठं तरी मुरतंय; आमदार धंगेकरांच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिली A टू Z माहिती
मुख्यमंत्र्याचा शब्द अंतिम असतो. तो पाळण्यात यावा. तत्पर सरकार म्हणून मिरवणारे एक वर्ष उलटूनही मदत देत नसतील तर घोषणेला काय अर्थ असा सवालही वडेट्टीवारांनी उपस्थित केला. मृतांच्या कुटुंबियांना तातडीने उर्वरित मदत देण्यात यावी अशी आग्रही मागणी करत जर यावेळी मदतीला विलंब झाला तर आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल असा इशाराच वडेट्टीवारांनी दिला आहे. दरम्यान, ही घटना गेल्यावर्षी २३ जुलै रोजी घडली होती. त्यामध्ये अचानक बसने पेट घेतल्याने त्यामध्ये होरपळून २५ लोकांचा मृत्यू झाला होता.