Video : तू कधी मरशील..? भाजप शहराध्यक्ष घाटेंबद्दल काँग्रेसच्या शिंदेंचे वादग्रस्त विधान

  • Written By: Published:
Video : तू कधी मरशील..? भाजप शहराध्यक्ष घाटेंबद्दल काँग्रेसच्या शिंदेंचे वादग्रस्त विधान

पुणे :  लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी हिंदूबद्दल केलेल्या विधानामुळे भाजप नेत्यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. पुणे शहरात भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करणारे फ्लेक्स उभारले आहेत.अनेक चौकांमध्ये लावण्यात आलेल्या या फ्लेक्सवर राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर फुली मारलेली असून बाजूला स्वामी विवेकानंद यांच्या फोटोसह “खबरदार हिंदू धर्माला नावे ठेवाल तर समुद्रात फेकून देईल” असा मजकूर छापण्यात आला आहे. याच पोस्टरवरून घाटे यांना प्रत्युत्तर देताना काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.

भाजप अध्यक्ष स्वतः पोलीस संरक्षण घेऊन फिरतात. त्यांचा मर्डर करणार कोण? त्यांना विचारा तुझं वागणं नेमकं काय आहे असे शिंदे म्हणाले. तू एकटा फिरू शकत नाही. कधी तू मरशील हे माहीत नाही. भाजपचे सर्व लोक बॉडीगार्ड घेऊन फिरतात, कारण यांनी कर्मचं तशी केली आहेत” असे वादग्रस्त विधान अरविंद शिंदे यांनी केल आहे.

हिंदूंच्या नावावर हिंसा केली जाते, लोकांना भीती घातली जाते ते लोक हिंदू नाहीत. खरा हिंदू असे कधीच करत नाही हे राहुल गांधी म्हणाले होते.भारतीय जनता पक्षाकडे कोणताही मुद्दा नसल्याने शब्द फिरवून वेगळे नरेटीव्ह तयार केले जात आहे. तिनके को डुबने का सहारा असा प्रकार चालला असून हिंदू कधीही अत्याचार करत नाही, इतर समाजाचा आदर करतो हेच राहुल गांधी म्हणाले,असं शिंदे म्हणाले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष मनोहर भिडे गुरुजी यांनी स्त्रियांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिंदे माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले धीरज घाटे?

अरविंद शिंदे यांनी केलेल्या विधानावर भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी आमच्या कर्माची चिंता करणे म्हणजे दारू पिणाऱ्याने व्यसनमुक्तीवर भाष्य करण्यासारख आहे. 35 वर्षापासून संघाच्या संस्कारात काम करत इथपर्यंत आलो आहे. आम्हाला कर्म शिकवण्याचा तुम्हाला अधिकार नाही. राहुल गांधींच्या विरोधात लावलेले पोस्टर अरविंद शिंदे यांना झोमले असून, हिंदू धर्माचा अपमान झाल्यानंतर आम्ही शांत बसणार नाही असे घाटे यांनी म्हटले आहे. शिंदेंचा तोल ढासळल्याने आणि चर्चेत येण्यासाठीच अरविंद शिंदे यांनी हे विधान केलं आहे

follow us
  • fb
  • instagram
  • youtube