Darshna Pawar Murder Case : एमपीएससी टॉपर दर्शना दत्तू पवार (Darshana Pawar) हत्याकांड प्रकरणात सातत्याने नव-नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी राहुल हांडेरेने या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलीस त्याची पुढील चौकशी करत आहेत. दरम्यान, आता या प्रकरणात राहुलने दर्शनाच्या हत्येनंतर पोलिसांना गुंगारा देण्यासाठी कोणकोणत्या ट्रिक वापरल्या याची माहिती समोर आली आहे.
‘राधाकृष्ण विखे पाटलांवर धाडी टाकण्याची हिंमत आहे का?’ झाकीर नाईकच्या वादात ठाकरेंची उडी
पोलिसांना गुंगारा देताना राहुलने वापरल्या युक्त्या :
दर्शनाचा खून केल्यानंतर राहुल पुण्यातून फरार झाला. त्यानंतर तो सांगलीला पोहचला, तेथून त्याने गोवा गाठलं. तिथूनही तो पळाला त्याने चंदीगड आणि नंतर पश्चिम बंगाल गाठलं. त्याने हा प्रवास फक्त पळून जाण्यासाठी नाही केला. तर त्याला पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी केला. प्रवासात त्याने फोन बंद ठेवला. मित्र आणि कुटुंबाला फोन करण्यासाठी दुसऱ्यांचे फोन वापरले. तर घरच्यांना फोन केल्यानंतर तो तात्काळ आपलं लोकेशन बदलत होता. जेणे करून पोलिस त्याला ट्रॅक करू शकत नव्हते. मात्र यावेळी पोलिसांनी त्याला त्याचे घरचे आजारी असल्याचं सांगितलं. तेव्हा तो मुंबईच्या दिशेने निघाला आणि पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
कसा लागला राहुलचा तपास :
दर्शनाची हत्या केल्यानंतर राहुल फारार झाला. तो वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरत होता. त्यामुळे त्याला पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. त्याला पकडण्यासाठी पोलिसांना नाशिकवरून त्याच्या नातेवाईकांना पुण्यात आणलं होतं. त्यांच्या मार्फत पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधला. यामुळे त्याचं मोबाईल लोकेशन कळू शकेल असा कयास पोलिसांचा होता. तो वेगवेगळ्या सिम कार्डवरून तो घरच्यांना संपर्क साधत होता. त्याचे पैसे संपल्याने तो घरच्यांकडे पैसे मागत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या घरच्यांनी त्याला पैसे देखील पाठवायला लावले होते. जेणेकरून त्याने एटीएमने पैसे काढल्यास त्याचे लोकेशन ट्रॅक केले जाईल.
राहुलने दर्शनाच्या हत्येचं कारण :
एमपीएससीमध्ये राज्यात तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या दर्शना पवार हिचा काही दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाल्याच समोर आलं होतं. राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला होता. पुण्यात सत्कार स्वीकारल्यानंतर आठ दिवसांपासून ती बेपत्ता होती. त्यानंतर थेट तिचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी दर्शनाचा मित्र आणि संशयित आरोपी राहुल हांडोरे याला अटक केली आहे. दर्शना राजगडावर गेली तेव्हा तिच्यासोबत राहुल होता. मात्र गडावरून परत येताना तो एकटाच दिसत होता. दर्शनाचा मृतदेह आढळून आल्यानंतर राहुल फरार होता. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांची पाच पथकं त्याचा शोध घेत होती.
खुंटीचं हिंदुत्व वेशींला टांगलं : पाटणा दौरा, मुफ्तींची भेट अन्…; CM शिंदेंनी सगळचं काढलं
दर्शना मुळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची होती. तर राहुल हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शहा गावचा आहे. दर्शना आणि राहुल एकमेकांचे जवळचे नातेवाईक होते. ते दोघेही पुण्यात राहून स्पर्धा परिक्षांची तयारी करत होते. दर्शना MPSC उत्तीर्ण झाल्यानंतर राहुलची दर्शनासोबत लग्न करण्याची इच्छा होती. मात्र दर्शनाने त्याला नकार दिला होता. अशात तिच्या घरच्यांनी तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. यामध्ये तो दर्शना आणि तिच्या घरच्यांना आणखी वेळ मागवून मागत होता. मात्र दर्शना आणि कुटुंबियांकडून कोणताही प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे त्याने तिची हत्या केली. सुरूवातीला तो गुन्हा कबुल करत नव्हता मात्र अखेर त्याने गुन्हा कबुल केला आहे.